मुंबई : मोबाइल फोनवर कॉल करून किंवा संदेश पाठवून नागिरकांच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन अनेकांना हजारो रुपयांचा गंडा घातल्याच्या घटना हल्ली दिवसाआड समोर येत आहेत. आतापर्यंत या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात नोकरदारवर्गापासून ते उच्चशिक्षित डॉक्टर, प्राध्यापक, बँकर्स अडकल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण आता तर थेट केंद्रीय मंत्र्यांनाचा भामट्याने मोबाइल कॉल करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.
केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांना हा अनुभव आला. शाळेच्या बसला अपघात झाला असल्याचा बनाव भामट्याने थेट आठवले यांना फोन करून मदतीसाठी पैशांची मागणी केली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी हा अनुभव आला. एका व्यक्तीने बनावट अपघाताची कहाणी सांगून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या सतर्क सहाय्यकामुळे पैसे गमावण्याचे टळले, असे आठवले यांनी सांगितले.