महाराष्ट्र

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात ; तीन जणांचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वसई पोलीस ताबडतोब दाखल झाले असून त्यांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि ट्रक यांची धडक झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात तीन जणांनी आपला प्राण गमावला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई सतीवली बजरंग हॉटेलसमोर हा अपघात घडला आहे. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना एका कार चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि त्यानंतर कार डिव्हायडर क्रॉस करून विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. या अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत चालकासह दोन प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वसई पोलीस ताबडतोब दाखल झाले असून त्यांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत.

Telegram ला केंद्र सरकारची नोटीस; बेकायदेशीर चित्रपट आणि ओटीटी कंटेंटवर कारवाईचे निर्देश

Mumbai Rain : पावसाचा जोर कायम; मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय, वसई-विरारलाही फटका, Video

केंद्राची मोठी कारवाई; यूएपीए अंतर्गत पाकिस्तानातील २३ जण दहशतवादी घोषित

जोगेश्वरीत भरधाव टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; पळ काढणाऱ्या चालकाला नागरिकांनी केलं पोलिसांच्या हवाली, Video