ANI
महाराष्ट्र

अखेर त्या व्हायरल फोटोवर श्रीकांत शिंदेंचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा नष्ट करण्याचे काम शिंदे पिता-पुत्र करत असल्याचे दिसून येत आहे. असे...

प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. या फोटोत श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. मात्र आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले. मी खासदार आहे, कुठे बसायचे आणि कुठे बसायचे नाही हे मला माहीत आहे. हे आमच्या घरातील ऑफिस आहे, मी ज्या खुर्चीवर बसलो ती माझी स्वतःची खुर्ची आहे. पण तिथे मुख्यमंत्री लिहिलेला बोर्ड आहे जे माझ्या लक्षात नाही आलं... श्रीकांत शिंदे यांनी खुलासा केला की, माझ्या मागे बोर्ड असल्याची मला कल्पना नव्हती.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनीही श्रीकांत शिंदे यांचे फोटो शेअर करून गंभीर आरोप केला होता. मेहबूब शेख यांनी फोटो ट्विट करून म्हटले की, 'मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सांभाळतात. मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा नष्ट करण्याचे काम शिंदे पिता-पुत्र करत असल्याचे दिसून येत आहे. असे त्यांनी म्हटले होते.

मुख्यमंत्री सुपुत्र श्रीकांत शिंदेच्या व्हायरल फोटोची सर्वत्र चर्चा

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका; २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली