महाराष्ट्र

कुटुंबातील पाच जणांचा एकमेकांना वाचवताना मृत्यू

एक मुलगा मोहम्मद साद हा पाण्याजवळ प्लेट धुण्याकरिता गेला असता पाय घसरून पडला

वृत्तसंस्था

जिल्ह्यातील कंधार येथील प्रसिद्ध सुफी संत हजरत सरवरे मगदूम साहेब यांच्या दर्शनासाठी नांदेडहून आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा एकमेकांना वाचवताना मृत्यू झाला. यात बापलेकासह दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. ही घटना रविवारी (ता.२१) सकाळी ११ वाजता घडली. मोहम्मद साद मो. सफियोद्दीन (१५), मोहम्मद सफियोद्दीन मो.अब्द्दुल गफार (३८), मोहमद विखारोद्दीन मो.फारोद्दीन (४४), सय्यद नवीद सय्यद वहिद (१५) व सय्यद सोहेल सय्यद वहिद (२०) अशी मृतांची नावे आहेत.

नांदेड येथील करबला, खुदबेनगर आणि इकबालनगर येथील भाविक रविवारी आपल्या ऑटोरिक्षा क्रमांक (एम.एच. -२६ बीडी ४५३१) या प्रवासी वाहनातून कंधार येथील हजरत सरवरे मगदूम साहेब दर्ग्याला आले होते. त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंब आणि लहान मुलांचा समावेश होता. सकाळी ११ च्या दरम्यान हे भाविक दर्शनासाठी आले होते. काही वेळानंतर श्री शिवाजी कॉलेज कंधार येथे जगतुंग तलावाच्या किनारी जेवण करण्यासाठी गेले होते. त्यापैकी एक मुलगा मोहम्मद साद हा पाण्याजवळ प्लेट धुण्याकरिता गेला असता पाय घसरून पडला. तो बुडत असल्याचे पाहून त्याचे वडील मोहम्मद सफियोद्दीन हे आपल्या मुलाला वाचवण्याकरिता गेले असता तेही बुडाले. त्यांना वाचवण्यासाठी मेव्हणा मोहमद विखारोद्दीन मो. फारोद्दीन धावले. तत्पूर्वी सय्यद नवीद सय्यद वहिद आणि त्याचा सख्खा भाऊ सय्यद सोहेल यांनीही पाण्यात उडी टाकून वरील व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न केला; पण पाण्यातील काटेरी कुंपणाच्या जाळ्यात अडकल्याने त्‍यांचा जीव वाचवता आला नाही. शेवटी मोहम्मद विखारोद्दीन यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या वेळी सय्यद वहिद यांनी आपली दोन मुले सय्यद नवीद आणि सय्यद सोहेल यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेऊन प्रयत्न केला; पण त्यांना दोन्ही मुलांना वाचवता आले नाही. नशीब बलवत्तर म्हणून सय्यद वहिद हे आपला प्राण वाचवण्यात यशस्वी ठरले.

आता मेट्रो गर्दीचे आव्हान

दिव्यांग कल्याण मंत्रालयालाच सहाय्याची गरज!

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार