महाराष्ट्र

वीज कोसळण्याची आगाऊ सूचना मिळणार; विदेशी यंत्रणेचा वापर करण्यासाठी प्रयत्न - महाजन

राज्यात वीज कोसळण्याच्या घटना घडल्या असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार वीज कोसळून २०२३ मध्ये १८१ जणांचा मृत्यू झाला. वीज पडून मृत्यू होण्याच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून विदेशात कुठल्या प्रकारच्या यंत्रणेचा वापर केला जातो, याचा वापर राज्यात करण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली.

Swapnil S

मुंबई : राज्यात वीज कोसळण्याच्या घटना घडल्या असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार वीज कोसळून २०२३ मध्ये १८१ जणांचा मृत्यू झाला. वीज पडून मृत्यू होण्याच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून विदेशात कुठल्या प्रकारच्या यंत्रणेचा वापर केला जातो, याचा वापर राज्यात करण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य संतोष दानवे यांनी वीज पडून मृत्यू होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला.

राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यात शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू झाला की त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. अशा कुटुंबांना चार लाख मदत दिली जाते, ही मदत वाढवून द्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

वीज कोसळून मृत्यू झाल्यामुळे चार लाख मदत केली जाते. ही मदत पुरेशी नसल्याने मदत वाढवावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई