महाराष्ट्र

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण ; भारतीय हवामान खात्याने दिले 'तेज' चक्रीवादळाचे संकेत

नवशक्ती Web Desk

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून याचा रुपांतर चक्रीवादळात होऊ शकतं, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्याचे जर चक्रीवादळात रुपांतर झालं. तर त्याला 'तेज' या नावानं ओळखलं जाईल. अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अद्याप एवढा शक्तीशाली झालेला नाही की त्यास चक्रीवादळाचा दर्जा देता येईल. पण पुढचे ४८ तास महत्वाचे मानले जात आहेत.

येत्या ४८ चाळीस तासात कमी ताबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. अरबी समुद्रात जर हे 'तेज' चक्रीवादळ तयार झाले तर किनारपट्टीमार्गे गुजरातच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईत पावसाची शक्यता नसली तरी काही भागातील तापमानात यामुळे घट होण्याची शक्यता आहे. यात मुंबई, पुणे या भागांचा समावेश आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस