काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटेंचे निधन (Photo -X)
महाराष्ट्र

काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटेंचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनंतराव थोपटे (वय ९३) यांचे निधन गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

Swapnil S

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनंतराव थोपटे (वय ९३) यांचे निधन गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी सहा वेळा प्रतिनिधित्व केले.

सुमारे चौदा वर्षे राज्य मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री होते. तसेच ते पुण्याचे पालकमंत्री देखील राहिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर थोपटे काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते होते.

पुणे जिल्ह्यात शरद पवारांना टक्कर देऊन काँग्रेस पक्ष वाढण्यात थोपटे यांचे मोठे योगदान होते. माजी आमदार आणि भाजपचे नेते संग्राम थोपटे यांचे ते वडिल होते. 

अनंतराव थोपटे यांना १९८३ साली पहिल्यांदा वसंतदादा पाटील यांनी मंत्रिपदाची संधी दिली होती.

Pune : "ज्येष्ठ नेतृत्व काळाच्या पडद्याआड"; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण

Mumbai : विसर्जन सुरक्षित पार पडण्यासाठी दक्षता घ्या! अतिरिक्त आयुक्त डॉ. ढाकणे यांचे निर्देश

महागाई भडकली! घाऊक महागाईचा दर ९.९२ टक्क्यांवर; किरकोळ महागाई ४.८२ टक्क्यांवर, अन्न, इंधन आणि उत्पादित वस्तू महागल्या

राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात UCC विधेयक मांडण्याच्या तयारीत - देवेंद्र फडणवीस

Maratha Reservation : मनोज जरांगेंची आज मुंबईकडे कूच; आझाद मैदानावर एकटेच उपोषण करणार