महाराष्ट्र

बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा! विनोद घोसाळकर यांचे आवाहन

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची बोरिवलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई : माझ्या मुलाची विश्वासघाताने झालेली हत्या हा आमच्यावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य असे बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचे षड‌्यंत्र रचले जात आहे. आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार सुरू आहे. ही बदनामी कृपा करून तत्काळ थांबवा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा, पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे, अशा तीव्र भावना शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात व्यक्त केल्या आहेत.

माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे. असे खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तत्काळ थांबवा, असे निवेदन घोसाळकर यांनी जारी केले आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची बोरिवलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर घोसाळकर यांच्याबाबत आक्षेपार्ह बाबी पसरवल्या जात असून एका निवेदनाद्वारे अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी हा किळसवाणा प्रकार थांबवण्यासाठी बजावले आहे. '१९८२ पासून मी सक्रिय राजकारणात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के राजकारण आणि २० टक्के समाजकारण या सूत्राचे तंतोतंत पालन करत आहे. मी आणि माझा पुत्र अभिषेक आम्ही निरपेक्षपणे आणि निष्ठेने राजकारण आणि समाजकारण केले आहे. शिवरायांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. निष्कलंकपणे आम्ही सामाजिक जीवनात वावरत आहोत, कोणताही डाग आमच्यावर नाही. मी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो. नंतर विधानसभेवर निवडून गेलो. मुलगा अभिषेक, सून तेजस्वी हेसुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आले. जनतेचे प्रेम आणि विश्वास आम्हाला मिळाला. त्याला आम्ही कधीही तडा जाऊ दिला नाही. जनतेची आम्ही नि:स्वार्थपणे सेवा केली, असे घोसाळकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Video : नर्मदा नदीत ११ हजार लिटर दूध अर्पण; श्रद्धा की अंधश्रद्धा? सोशल मीडियावर चर्चा

Puducherry Assembly Elections 2026 : मतदान केंद्रावर साडीतील रोबोट! पुदुच्चेरीत 'निला'कडून मतदारांचे स्वागत; VIDEO व्हायरल

"कुत्र्याची शेपूट वाकडीच...त्याच्या तोंडाला काळं फासून..."; शक्तिमानची खिल्ली उडवल्याने मुकेश खन्ना भडकले, समय रैनाला चांगलेच झापले

Mumbai : ३१ मे पर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण करा! पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

KDMC शाळांमध्ये लवकरच अभ्यासिका; मुंबई पालिका शाळांच्या धर्तीवर उपक्रम