महाराष्ट्र

विहीरीच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा पडल्याने चार मजूर अडकले, शोधकार्य सुरु

सध्या या कामगारांचा जीव वाचवण्यासाठी एनडीआरएफचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून त्यांना बाहेर काढण्याच शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत

नवशक्ती Web Desk

इंदापूर येथे म्हसोबाची वाडीमध्ये एक दुर्घटना घडली आहे. 80 फूट खोल विहीरीमध्ये रिंग करण्याची काम करत असताना एक अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने चार कामगार त्याखाली दबले गेल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्यांची नावं जावेद अकबर मुलानी, सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, परशुराम बन्सीलाल चव्हाण आणि मनोज मारुती चव्हाण ही नाव असून हे कामगार 30-40 वर्ष वयोगटातील आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

सध्या या कामगारांचा जीव वाचवण्यासाठी एनडीआरएफचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून त्यांना बाहेर काढण्याच शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. विहिरीचा वरचा भाग हा मातीचा असल्यामुळे 30 फुट खोल जमिनीमध्ये सिमेंट क्रॉंकेटीकरण करण्याचं काम सुरू होतं. बेलवाडी मध्ये 4 जण हे काम होते. मात्र, अचानक वरुन मातीचा ढिगारा कोसळला आणि त्याखाली हे मजूर दबले गेले. सध्या पोकलेन मशिनच्या मदतीने तो ढिगारा तातडीने बाजूला काढण्याच काम केलं जात आहे.

नेहमीप्रमाणे काम झाल्यानंतर संध्याकाळी हे चारही जण घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. विहिरीजवळ त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसून आल्या, मात्र ते चार लोक सापडले नाहीत. त्यानंतर गावकऱ्यांनी या ढिगार्‍याखाली हे लोक अडकले असतील अशी भीती व्यक्त केली. यानंतर इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी या ठिकाणी येऊन घटनेचा आढावा घेऊन तातडीने पुढची शोधमोहीम चालू केली.

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार

NPS आता अधिक आकर्षक; आजपासून १०० टक्के समभागात गुंतवणुकीची परवानगी