@ChhaganCBhujbal/X
महाराष्ट्र

चौपदरी रस्त्यांमुळे दळणवळण वाढणार - छगन भुजबळ; पिंपळस ते येवला, लासलगाव-विंचुर-खेडलेझुंगे चौपदरी रस्त्यांसाठी ६९४ कोटी

उपलब्ध निधीतून तयार होणाऱ्या चौपदरी क्राँकीट रस्त्यांमुळे वाहतूक सुरळीत होणार तसेच अपघातांचे प्रमाण कमी होऊन दळवणवळणास चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

Swapnil S

लासलगाव : उपलब्ध निधीतून तयार होणाऱ्या चौपदरी क्राँकीट रस्त्यांमुळे वाहतूक सुरळीत होणार तसेच अपघातांचे प्रमाण कमी होऊन दळवणवळणास चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. निफाड तालुक्यातील विंचूर चौफुली येथे आयोजित पिंपळस ते येवला, लासलगाव-विंचुर-खेडलेझुंगे चौपदरी रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

मंत्री भुजबळ यावेळी म्हणाले, पिंपळस ते येवला रस्त्यासाठी चार वर्षे सातत्याने पाठपुरावा करून ५६० कोटी निधी मंजूर करून घेतला आहे. लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठे कांद्याचे मार्केट आहे. लासलगाव-विंचूर रस्त्यावर अपघाताचे प्रमाण अधिक होते. यासाठी १३४ कोटी रुपये लासलगाव विंचूर खेडलेझुंगे रस्ता मंजूर करण्यात आला आहे. रुई फाटा ते खेडलेझुंगे या ६ कि.मी रस्त्याचे काम CMGSY टप्पा ३ मधून होणार असून यासाठी ८० कोटी निधीस लवकरच प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. रुईफाटा ते धारणगाव हा २ किमीचा रस्ता आगामी अर्थसंकल्पातून काँक्रीटचा करणार असल्याचे मंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

लासलगाव, विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी अधिक १० कोटी रुपये मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच या परिसरातील नागरिकांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याचप्रमाणे धुळगावसह १६ गावे, राजापूरसह ४१ गावे पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून योजना पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लासलगाव उपजिल्हा रुग्णालयासाठी रुपये १३.५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच लासलगाव शिवनदी व विंचूर लोनगंगा नदी स्वच्छता करण्यासाठी रुपये २७ कोटी निधी मंजूर झाला आहे. लासलगाव बाह्य वळण रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असून मार्चपर्यंत हे काम पूर्ण केले जाईल. सिन्नर व शिर्डीकडे जाणारा बोकडदरा खेडलेझुंगे रस्त्याची रुंदी ५.५ मीटरवरून ७ मीटर होणार असल्याने दळणवळण अधिक सुलभ होणार असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी खासदार समीर भुजबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, मुख्य अभियंता प्रशांत औटी, उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार विशाल नाईकवाडी, गटविकास अधिकारी उमेश पाटील, सरपंच सचिन दरेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

लासलगावात भव्यदिव्य प्रकल्प

येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण शिवसृष्टी प्रकल्पातून सकारत आहे. पाच एकर जागेत सुमारे २१ कोटी रुपये खर्च करून भव्यदिव्य प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे २६ सप्टेंबर २०२४ रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. तर २२ सप्टेंबर रोजी या पुतळ्याचे आगमन होणार असून पुतळ्याचे जल्लोषात स्वागत होणार असून नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश