महाराष्ट्र

"गांजा लागवडीची परवानगी द्या", यवतमाळच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं शासन दरबारी निवेदन

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या संघटनेतील काही शेतकऱ्यांच्या वतीने अमरावती विभागीय आयुक्तांना याबाबतचं निवेदन दिलं आहे.

नवशक्ती Web Desk

राज्यात गेली दोन दिवस झालेल्या वादळी अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अनेक ठिकाणी झालेल्या गारपीटीमुळे फळबागांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी हा मोठ्या संकटात सापडला आहे. अशात बारमाही काही ना काही संकटात सापडलेल्या यवतमाळ येथील एका शेतकऱ्यांने एका सरकारी अधिकाऱ्याकडे गांजा लागवडीची मागणी केली आहे. मनीष जाधव या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या संघटनेतील काही शेतकऱ्यांच्या वतीने अमरावती विभागीय आयुक्तांना याबाबतचं निवेदन दिलं आहे.

लहरी हवामानामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. या पारंपारिक पिकापासून त्यांना योग्य परतावा मिळत नाही, यामुळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने आता गांजा लागवडीला अधिकृत मान्याता देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी या निवेदनातून केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला विभागयी आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, एक सरकारी अधिकारी म्हणून शेतकऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारकडे मांडण्याचे त्यांचे कर्तव्य आहे. गांजा लागवडीबाबत कायदा स्पष्ट असला तरीही या प्रकरणी निर्णय घेणं राज्यावर अवलंबून असल्याचं त्या म्हणाल्या.

दरम्यान, अडचणीत असेल्या शेतकऱ्यांनी देखील आपली मागमी मांडली आहे. गांजा पिकवण्याची आमची मागणी प्रतिकात्मक स्वरुपाची असून राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी असल्याचं, हे कापूस उत्पादक शेतकरी म्हणाले. यवतमाळ जिल्हा हा पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे उद्ध्वस्त झाला. तर नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखीणचं भर पडली. परंतु, सरकारी मदत आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही, असं म्हणत यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत आगाऊ रक्कमही नाकारण्यात आल्याचं या शेतकऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस