Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी आणखी ४ विशेष गाड्या; उद्यापासून आरक्षण सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी आणखी ४ विशेष गाड्या; उद्यापासून आरक्षण सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक

गणेशोत्सवासाठी रेल्वेने ४ विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. या गाड्यांचे आरक्षण २९ ऑगस्टपासून सुरू होणार असून, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक.

Krantee V. Kale

मुंबई : गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि मडगावदरम्यान आणखी चार गणपती विशेष रेल्वे सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत.

०१००७ क्रमांकाची विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११ आणि १३ सप्टेंबर रोजी रात्री १२.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल, तर ०१००८ क्रमांकाची विशेष गाडी मडगाव येथून ११ आणि १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी येथे थांबे देण्यात आले आहेत. विशेष गाडीमध्ये २ एसी थ्री-टियर, १२ स्लीपर क्लास, ६ जनरल सेकंड क्लास आणि २ सेकंड सिटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन अशी डब्यांची रचना असेल.

विशेष गाडीची महत्त्वाची माहिती

गाडी क्रमांक ०१००७

  • मार्ग : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव

  • प्रस्थान : ११ आणि १३ सप्टेंबर रोजी रात्री १२:४० वाजता

  • पोहोचण्याची वेळ : त्याच दिवशी दुपारी ३:३० वाजता

  • प्रस्थानाचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

गाडी क्रमांक ०१००८

  • मार्ग : मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

  • प्रस्थान : ११ आणि १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता

  • पोहोचण्याची वेळ : दुसऱ्या दिवशी सकाळी ८:१५ वाजता

  • प्रस्थानाचे ठिकाण : मडगाव

कुठे-कुठे थांबणार?

या विशेष गाडीला पुढील स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे:

दादर → ठाणे → पनवेल → पेण → रोहा → माणगाव → वीर → खेड → चिपळूण → सावर्डा → अरवली रोड → संगमेश्वर रोड → रत्नागिरी → आडवली → विलवडे → राजापूर रोड → वैभववाडी रोड → नांदगाव रोड → कणकवली → सिंधुदुर्ग → कुडाळ → सावंतवाडी रोड → थिविम → करमळी

डब्यांची रचना

विशेष गाडीमध्ये एकूण २२ डबे असतील.

  • २ डबे – एसी थ्री-टियर

  • १२ डबे – स्लीपर क्लास

  • ६ डबे – जनरल सेकंड क्लास

  • २ डबे – सेकंड सिटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन

या गाड्यांचे आरक्षण २९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ०१००७ क्रमांकाच्या गणपती आरक्षित विशेष गाडीचे आरक्षण २९ ऑगस्ट पासून सर्व संगणकीकृत प्रवासी आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी नियमित दराने युटीएस प्रणालीद्वारे तिकीट काढता येणार आहे

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : मित्रानेच केला गेम! फेसबुक किंग बंटी दीक्षितचा निर्घृण खून; आधी कारने स्कूटरला उडवलं, नंतर...

सातारा जिल्हा बँकेच्या नऊ जागा बिनविरोध; दहा वर्षांच्या संचालकपदाचा दिग्गजांना फटका, निवडणुकीत मोठी माघार

Wardha : पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरला लगावली जोरदार थप्पड; डॉक्टरांकडून कारवाईची मागणी, CCTV व्हिडीओ व्हायरल

Mumbai : भुलेश्वरमध्ये जुन्या भूमिगत केबल्स बदलणार; २०० कोटी रुपये खर्च, बेस्टचा निर्णय

Mumbai : कथित शिकारीप्रकरणी चितेच्या राखेची तपासणी; दोन छर्रे आणि अर्धवट जळालेला मोबाईल जप्त, दोघांना कोठडी