महाराष्ट्र

घोटी : पती-पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; रेल्वेखाली उडी मारत संपवलं जीवन

इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या घोटी शहरातील सुधानगर येथील पती-पत्नीने रेल्वे खाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Krantee V. Kale

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या घोटी शहरातील सुधानगर येथील पती-पत्नीने रेल्वे खाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवार (दि. ६) रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असून आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी नाशिकहून इगतपुरीकडे जाणाऱ्या रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेखाली दिनेश देविदास सावंत, (वय ३८ ), विशाखा दिनेश सावंत, ( वय ३३ ) यांनी उडी घेऊन या पती-पत्नीने आपले जीवन संपवले. या बाबतची खबर देविदास देवाजी सावंत यांनी घोटी पोलिसांना दिली असून पोलिसांनी पंचनामा करीत घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे. या दुर्दैवी धक्कादायक घटनेने इगतपुरी तालुक्यासह घोटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य