गोंदिया : मानवी बळी घेणारी वाघीण जेरबंद Photo : X
महाराष्ट्र

गोंदिया : मानवी बळी घेणारी वाघीण जेरबंद

महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये दहशत पसरवणाऱ्या आणि दोन व्यक्तींचा बळी घेणाऱ्या एका वाघिणीला रविवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले.

Swapnil S

गोंदिया : महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये दहशत पसरवणाऱ्या आणि दोन व्यक्तींचा बळी घेणाऱ्या एका वाघिणीला रविवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले.

ट्रॅकिंग कॉलरवरून 'टी २७' अशी ओळख पटलेली ही वाघीण १९ मार्च ते २४ एप्रिल दरम्यान एका पुरुष आणि एका महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरली होती, तर अन्य दोन व्यक्ती तिच्या हल्ल्यात जखमी झाल्या होत्या. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वाघिणीच्या एका पुढच्या पायाला दुखापत झाल्यामुळे ती सोप्या शिकारीच्या शोधात मानवी वस्त्यांजवळ येत होती.

सुमारे दोन महिने वनविभागाला गुंगारा दिल्यानंतर, अखेर साकोली तालुक्यातील आमगाव बुज येथे एका उसाच्या शेतात या वाघिणीला पकडण्यात आले. तिला पुढील उपचारांसाठी नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात (ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर) हलवण्यात आले आहे.

(संबधीत इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई, ठाणे, पालघरला पुढील चार दिवस 'यलो अलर्ट'; २ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा; सातही धरणांतील पाणीसाठा खालावल्याने चिंता वाढली

अयोध्या अपहार : आठही आरोपींच्या घरांवर छापे

केतन अगरवाल हत्या प्रकरण : लोहगडावर 'डमी'चा वापर करून गुन्ह्याचे पुनर्निर्माण

TET पेपरफूट : आंतरराज्यीय रॅकेटचा संशय; तिघांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Palghar : वाढवण ऐतिहासिक पर्व ठरेल; मुख्यमंत्र्यांचा दावा; म्हणाले, ‘मच्छिमारांना विश्वासात घेऊनच विकास’