महाराष्ट्र

महिलांमधील पोस्टपार्टम डिप्रेशनवर सरकारचे धोरण

आदिती तटकरे यांचे विचार: विश्वराज हॉस्पिटलमध्ये उर्मी फर्टिलिटी सेंटरचे उद्घाटन

नवशक्ती Web Desk

पुणे : "मातृत्वानंतर महिलामध्ये पोस्टपार्टम डिप्रेशन मोठ्या प्रमाणात येते. यात त्यांची मानसिकता ही संपूर्णपणे खचली जाते. नोकरी करणाऱ्या महिलांना अचानक बाळाचे संगोपण करण्यासही अडचण येते. त्यामुळेच राज्य सरकार या गंभीर विषयावरील धोरणावर गेल्या तीन वर्षापासून कार्य करीत आहेत. तसेच सर्व वैद्यकीय सेवेने यावर जास्तीत जास्त कार्य करावे.”असे विचार महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले.

लोणी काळभोर येथील माईर्स विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने तत्वदर्शी, प्रज्ञावंत कवयित्री उर्मिला कराड यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या ‘उर्मी फर्टिलिटी सेंटर’(आय.व्ही.एफ)च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती कराड होत्या.

यावेळी माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समुहाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल वि.कराड, महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, उर्मी फर्टिलिटी सेंटर (आय.व्ही.एफ) चे संचालक डॉ. आशिष काळे व डॉ. अश्विनी काळे उपस्थित होत्या.

या प्रसंगी डॉ. चंद्रकांत हरपाले, डॉ. कल्पना खाडे, लोणी काळभोरच्या सरपंच गौरी काळभोर, उपसरपंच ललिता काळभोर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हर्षा पालवे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संतोष पवार यांनी आभार मानले.

आदिती तटकरे म्हणाल्या," मातृत्वाला प्राप्त करणे महिलांच्या जीवनातील सर्वात सुवर्ण क्षण असतो. लग्नानंतर तिला पुढील दोन चार वर्षात अपत्य झाले नाही, तर कुटुंबाकडून ‘गुड न्यूज’ कधी हा प्रश्न वारंवार विचारला जातो. अशा वेळेस देवा नंतर दुसरी अपेक्षा ही डॉक्टरांकडूनच असते. ते त्यांना नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे घेऊन जातात. प्रत्येक हॉस्पिटल असे असावे की जेथे गरीब रूग्णाला योग्य व माफक दरात उपचार मिळावाच परंतू उच्च वर्गातील रुग्णाला सुद्धा ही जाणीव होऊ देऊ नये की त्याला त्याच्या सुविधांनुसार उपचार मिळत नाही. पण विश्वराज हॉस्पिटलमध्ये दोन्ही वर्गातील रुग्णासाठी योग्य अत्याधुनिक सुविधा आहेत.”

राहुल कराड म्हणाले," आजच्या काळात स्ट्रेस, वाईट सवयी, खाण्या पिण्याच्या सवयींचा परिणाम महिलांच्या शरीरावर होतांना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल झाला आहे. ज्यांना मातृत्व हवे असेल अशा महिलांसाठी उर्मी आयव्हीएफ सेंटर नक्कीच लाभदायक ठरेल. येथे सेवा भावाची संस्कृती जपली आहे. या संदर्भात आजूबाजूच्या खेड्यात या संदर्भात जागृती करावी. आईच्या नावाने सुरू केलेल्या उर्मी आयव्हीएफ सेंटर नक्कीच मातृत्वाच्या चेहर्‍यावर हास्य आणेल.”

मातृत्व हा विषय केवळ त्या महिलाशी नाही तर संपूर्ण कुटुंबाशी निगडीत असतो. यावेळी त्या महिलेच्या मानसिकतेचा विचार करणे खूप गरजेचे आहे. उर्मी सेंटर नक्कीच सर्वासाठी वरदान ठरणार आहे. तसेच स्त्रीला मातृत्व व पुरूषाला पित्याचा दर्जा देण्यासाठी कार्य करेल.

डॉ. अदिती कराड

आयव्हीएफ सेंटर संदर्भात समाजात बरेच गैरसमज होते परंतू काळानुसार ते कमी होतांना दिसत आहे. या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा व तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने त्याचा लाभ नक्कीच सर्वांना मिळेल.

- डॉ. आशिष काळे

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी