महाराष्ट्र

बारामती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांचा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार

प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते घेण्यास बारामती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी नकार दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले दांपत्यासंदर्भात कोश्यारी यांनी केलेली वादग्रस्त विधाने लक्षात घेता त्यांच्या हातून पुरस्कार घेण्याऐवजी मी कार्यालयात जाऊन तो स्वीकारेन, असे राजेंद्र पवार यांनी म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील सुप्त संघर्ष वेळोवेळी उघड झाला आहे. आता हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे वडील आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हातून पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने राजेंद्र पवार यांना कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार जाहीर केला आहे.

चाचपडते विरोधक, धडपडते सरकार

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न