महाराष्ट्र

मुरूडच्या समुद्रकिनाऱ्यावर भरकटली गुजरातची मासेमारी नौका; बोटीतील १० खलाशांना वाचविण्यात यश

हवेचा जोरदार प्रहार व लाटांच्या प्रचंड माऱ्यामुळे ही बोट सरकत सरकत मोरे येथील गावदेवी मंदिर परिसरात येऊन अडकून पडली

वृत्तसंस्था

मुरूड समुद्रकिनाऱ्यापासून ३ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पद्मदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस ९ ऑगस्ट रोजी सायंकाळीच्या सुमारास गुजरात येथील वेरावन बंदरातील बोट मासळी पकडत असतांना बोटीचा पंखा तुटल्याने बोट फरकडत कासा किल्ला परिसरावर अडकून पडली होती. बोटीचा पंखा तुटल्याने बोट पुढे जात नव्हती, म्हणून बोटीच्या तांडेलने बोट नांगर टाकून एका जागी थांबवून ठेवली होती. परंतु हवेचा जोरदार प्रहार व लाटांच्या प्रचंड माऱ्यामुळे ही बोट सरकत सरकत मोरे येथील गावदेवी मंदिर परिसरात येऊन अडकून पडली. या बोटीवर ऐकून दहा जण होते. मुरुड पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा करून कोस्टल गार्डच्या मदतीने हेलिकॅप्टर मागवून सर्वाना सुखरूप किनाऱ्याला आणण्यात यश मिळाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून समुद्रात मोठया प्रमणात वादळ निर्माण झाले आहे. या वादळामुळे गुजरातमधून मासेमारी करण्यासाठी आलेली नौका तांत्रिक बिघाडामुळे समुद्रात भरकटत राहीली. त्यानंतर वादळाच्या प्रवाहात ती नौका मंगळवारी मुरुडच्या पद्मदुर्ग किल्ल्याच्या मागे रात्रभर अडकून पडली. यावेळी बंदर खात्याने व स्थानिक प्रशासनाने त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले परंतु खवळलेल्या समुद्रातील लाटांमुळे रात्री ते शक्य झाले नाही.

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या...

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

मनरेगाचे नाव इतिहासजमा; VB-G RAM G विधेयक मंजूर, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, "हे सर्व गरिबांच्या...

BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...