प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

गुटख्याची विक्री होत असल्यास अधिकाऱ्यांचे निलंबन; मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि तत्सम अमली पदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज झाला आहे. या पुढे बंदी असलेले प्रतिबंधित पदार्थ सापडल्यास त्या संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि तत्सम अमली पदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज झाला आहे. या पुढे बंदी असलेले प्रतिबंधित पदार्थ सापडल्यास त्या संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री होत आहे, असे निर्दशनाला आल्यास त्या कार्यक्षेत्राच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकही मंत्री झिरवाळ यांच्या निर्देशानंतर काढण्यात आले आहे. या अंतर्गत सर्व विभागीय सह आयुक्त (अन्न) यांना प्रतिबंधित अन्नपदार्थांची छुप्या पध्दतीने व अवैध मार्गाने विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकावर प्रभावीपणे कारवाई करण्याचे आदेश अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनीही परिपत्रकाद्वारे दिले आहेत. झिरवाळ यांनी सहआयुक्तांना अन्न आस्थापनांची तपासणी करावी तसेच विक्री, साठा व वितरण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.

माघार नाहीच; UPI शुल्काबाबत सरकार ठाम, व्यापारी नाराज; रोखीचे व्यवहार वाढण्याची भीती

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

Maratha Reservation : मनोज जरांगे आज दुपारी मुंबईकडे निघणार

आमदारांचे बहुमत ही कसोटी पुरेशी आहे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल