मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गुंज' कार्यक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. राहुल गांधी यांची तरुणाईमध्ये वाढती क्रेझ लक्षात घेऊन भाजपानेही त्याची क़ॉपी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पुण्यातील महिला विशेष छात्रों की गुंज कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशामुळे आपणही जेन-झी बरोबर संवाद साधू या भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात कार्यक्रम घेतला पण तो सुपरफ्लॉप ठरला. फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
फडणवीसांच्या जेन-झी संवाद कार्यक्रमावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राहुल गांधी हे समाजातील सर्व घटकांशी संवाद साधत आहेत. सध्या विद्यार्थ्यांचा, शिक्षणाचा मुद्दा घेऊन ते छात्रों की गुंज हा कार्यक्रम करत आहेत. हा कार्यक्रम राजकीय नसून फक्त तरुणाईशी संवाद साधण्याचा त्यांचे विचार घेण्यासाठी हे व्यासपीठ आहे.
भाजप दिशाभूल करतोय
महिला आरक्षणाचा पहिला निर्णय काँग्रेस सरकारनेच घेतला व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण लागू केले त्याचा लाभ देशातील लाखो महिला घेत आहेत. संसदेत २०२३ सालीच महिला आरक्षण एकमताने मंजूर झालेले आहे, फडणवीस यांनी त्याबद्दल आनंदोत्सव केला हे, त्याची अमंलबजावणी मोदी सरकारने केलेली नाही. खोटे बोलून दिशाभूल करण्याचा भाजप व फडणवीस यांचा हा डावही जनतेने ओळखला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.