वनसंपदेसाठी न्यायालयात दाद मागू; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

वनसंपदेसाठी न्यायालयात दाद मागू; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

भ्रष्टाचाराची मलई खाण्याच्या नादात गुजरातच्या कंपनीला ‘सह्याद्री’ विकला आहे. सह्याद्रीचा वारसा विकण्याचा भाजप-महायुती सरकारचा प्रयत्न महाराष्ट्राची जनता कदापी सहन करणार नाही.

Swapnil S

कर्जत/मुंबई : भ्रष्टाचाराची मलई खाण्याच्या नादात गुजरातच्या कंपनीला ‘सह्याद्री’ विकला आहे. सह्याद्रीचा वारसा विकण्याचा भाजप-महायुती सरकारचा प्रयत्न महाराष्ट्राची जनता कदापी सहन करणार नाही. भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व मनसुबे हाणून पाडू, वेळप्रसंगी कर्जत-भीमाशंकरच्या वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

टोरंट कंपनीसाठी कर्जत- भीमाशंकरच्या जंगलात होत असलेल्या झाडांच्या कत्तलीची पाहणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली व स्थानिक गावकऱ्यांशी संवाद साधला.

सपकाळ म्हणाले की, टोरंट कंपनीसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे. भाजप सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून महाराष्ट्र विकायला काढला आहेच, पण आता कमिशनसाठी निसर्गही विकायला काढला आहे. कर्जत- भीमाशंकरच्या जंगलात होत असलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा नाही. या प्रकल्पातून हजारो रोजगार निर्माण होतील, या वृक्षतोडीच्या बदल्यात दुसरीकडे लाखो झाडे लावू या केवळ पोकळ घोषणा आहेत. याआधी याच सरकारने ३३ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला होता त्याचे काय झाले. यातील एकही झाड कोणी पाहिले नाही. हा प्रकल्प अत्याधुनिक असल्याचे सरकार सांगत आहे. मग हजारो रोजगार कुठून येणार. मुळात भाजप सरकार व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बोलण्यावर कोणाचाही विश्वास नाही. ते महाराष्ट्राची दिशाभूल करत असून फेक नरेटिव्ह पसरवत आहेत, असा इशारा त्यांनी दिला.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; नेरळ-माथेरान 'मिनी ट्रेन' आजपासून पुन्हा धावणार, बघा वेळापत्रक

मतवारी दुष्काळाची! पर्यावरण मतपेटीत कधी उतरणार? दुष्काळमुक्तीसाठी राजकीय इच्छाशक्ती आणि मतदारांच्या जागरूकतेची गरज

कचरा टाकणाऱ्यांना ‘एआय’ कॅमेऱ्याची तंबी; मुंबई मनपाचा उपक्रम, कचरा इतरत्र टाकताच स्वच्छतेचा संदेश मिळणार

मुंबईसह आठ शहरांत रेल्वेची डोअरस्टेप पार्सल सेवा; खासगी लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या मदतीने घरपोच पार्सलची सुविधा

Mumbai : नव्याने मुद्रांक शुल्कास मज्जाव; उच्च न्यायालयाचा निकाल