महाराष्ट्र

पोलिसांच्या ताब्यात असलेला 'तो' रॅपर गायब असल्याची धक्कादायक बातमी समोर...

नवशक्ती Web Desk

काही दिवसांपूर्वी एका रॅपरने सेल्फ मेड रॅप पोस्ट करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर तो रॅप व्हायरल झाला. मात्र त्याच्या पोस्टनंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सहकार्य न केल्याने आता त्यांच्या भावाने राजकीय नेत्यांच्या मदतीने माझ्या भावाचा पत्ता लागत नसल्याचे भावनिक वक्तव्य केले आहे. पोलिसांना विचारल्यास ते फक्त तुरुंगात आहे असे सांगतात, मात्र कोणत्या तुरुंगात आहे हे सांगायला कोणी तयार नाही. मुंबईला विचारल्यास संभाजीनगरला आहे सांगत आहेत तर, संभाजीनगर पोलीस तो मुंबईला असल्याचे सांगत आहेत.

संभाजीनगर येथील राज मुंगसे या तरुणाने काही दिवसांपूर्वी रॅप केला होता. त्या रॅपमध्ये राजकीय टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आता राजकारण तापले असून राज मुंगसे यांच्या कुटुंबीयांनी थेट आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधून राज मुंगसे बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यामुळेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून सरकारने त्यांना लवकरात लवकर शोधून त्यांच्याबद्दलची माहिती राज मुंगसे यांच्या कुटुंबीयांना द्यावी, अशी मागणी केली आहे.

पुणे ‘हिट ॲण्ड रन’प्रकरणी बिल्डरसह सात जणांना अटक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

देशातील जनताच माझी उत्तराधिकारी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू

‘इंडिगो’त प्रवाशावर उभ्याने प्रवासाची वेळ, चूक लक्षात येताच विमान माघारी परतले

भाजपची नवी चाणक्यनीती गरज सरो, वैद्य मरो