राज्यात उष्माघाताचे १० बळी, १९ संशयित मृत्यू; आरोग्य विभागाच्या अहवालातील माहिती 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

राज्यात उष्माघाताचे १० बळी, १९ संशयित मृत्यू; आरोग्य विभागाच्या अहवालातील माहिती

जून महिन्यांचे २० दिवस उलटले तरी उन्हाचा तडाखा कायम आहे. राज्यात सूर्य आग ओकत असून पारा ४० अंश सेल्सिअसवर गेला आहे. मार्च महिन्यापासून तापमानात वाढ झाली असून राज्यात उष्माघाताचे १० बळी गेले आहेत, तर १९ संशयित मृत्यू असून उष्माघाताचा त्रास झालेल्या ३११ जणांची नोंद झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : जून महिन्यांचे २० दिवस उलटले तरी उन्हाचा तडाखा कायम आहे. राज्यात सूर्य आग ओकत असून पारा ४० अंश सेल्सिअसवर गेला आहे. मार्च महिन्यापासून तापमानात वाढ झाली असून राज्यात उष्माघाताचे १० बळी गेले आहेत, तर १९ संशयित मृत्यू असून उष्माघाताचा त्रास झालेल्या ३११ जणांची नोंद झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.

गेल्या काही वर्षांत जगभरातील तापमानात बदल जाणवू लागला आहे. उष्माघाताचे आजार वाढले आहे. उष्माघात हा एक प्रकारे गंभीर आजार आहे. शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढले, तर शरीराला सूर्याच्या गरमीपुढे सामान्य पातळी ठेवणे अशक्य होते. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर येते. राज्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून १ मार्च १९ जूनपर्यंत राज्यभरात उष्माघाताचे एकूण ३११ रुग्ण आढळले आहेत. यापैकी १० जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असून १९ संशयित मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

येथे उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक उष्माघाताचे ५१ रुग्ण, नंदुरबार २८, गडचिरोली २४, अमरावती २२, वर्धा २२, बुलढाणा येथे १९ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात मात्र अद्याप एकही उष्माघाताचा रुग्ण अथवा मृत्यू नोंदलेला नाही.

उष्माघाताची राज्यातील स्थिती

  • एकूण उष्माघाताचे रुग्ण : ३११

  • मृत्यू : १०

  • संशयित मृत्यू : १९

  • सर्वाधिक रुग्ण : औरंगाबाद - ५१

  • मुंबईतील रुग्णसंख्या : ०

आजचे राशिभविष्य, ४ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

विकेंडला घरच्यांना द्या खास ट्रीट! अशी बनवा खमंग हैदराबादी चिकन बिर्याणी

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक चार रात्री बंद; ऐरोली-काटई नाका पुलावर गर्डर टाकण्याचे काम, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

Mumbai : जोगेश्वरी उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती; महापालिका २७ कोटी २४ लाख खर्च करणार, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

Tirupati Blast : फार्मा कंपनीत मोठी दुर्घटना! बॉयलरच्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी; बचावकार्य सुरू, VIDEO