महाराष्ट्र

एचएमपीव्हीचा धोका; पुण्यात खबरदारी; रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्याच्या हालचालींना वेग

ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) या संभाव्य आजाराचा धोका लक्षात घेऊन राज्यासह पुण्यात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

Swapnil S

पुणे : ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) या संभाव्य आजाराचा धोका लक्षात घेऊन राज्यासह पुण्यात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये या आजाराच्या रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्याच्या हालचालीला आता वेग आला असून आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आल्याचे चित्र आहे.

कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस वेगाने पसरत आहे. भारतात देखील आतापर्यंत तीन जणांना एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाली आहे. कर्नाटकमध्ये सुरुवातील दोन जणांना एचएमपीव्हीची लागण झाल्याचे समोर आले होते. आता गुजरातमधील २ वर्षांच्या मुलाला एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान, आरोग्य सेवा संचालनालय, पुणे यांनी याबाबत एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, याबाबतची माहिती मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.

नायडू हॉस्पिटलमध्ये ३५० बेडची सोय

ह्युमनमेटाप्युमो व्हायरससंदर्भात महाराष्ट्र आरोग्य विभागाने काही सूचना जाहीर केल्या आहेत. त्यात नागरिकांनी कशी काळजी घ्यावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पुण्यात या व्हायरस संदर्भात खबरदारीसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये ३५० बेडची सोय करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र महापालिका प्रशासन नायडू हॉस्पिटलला देणार असल्याची माहिती आहे. राज्यात अजून एकाही रुग्ण नसला तरी महापालिका खबरदारीचा उपाय म्हणून बेड राखीव ठेवण्याच्या हालचालीला वेग आला आहे.

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना

बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

Thane: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

शेजाऱ्याने ५ वर्षांच्या चिमुकल्याला 'फुटबॉल'सारखं तुडवलं; धक्कादायक CCTV Video व्हायरल, गुन्हा दाखल

निवृत्तीपूर्वी जज फारच षटकार मारत आहेत! सुप्रीम कोर्टानेच न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर ओढले ताशेरे