महाराष्ट्र

सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ, गृहमंत्र्यांचे आदेश

मला वाटत नाही की त्यांच्या जीवाला धोका आहे. पण तरीही त्यांनी व्यक्त केलेल्या भीतीकडे लक्ष द्यायला हवे

वृत्तसंस्था

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (शनिवारी) भेट घेतल्यानंतर गृहराज्यमंत्री वळसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या जीवाला धोका असल्याच्या सदाभाऊ खोत यांनी केलेल्या आरोपावर गृहराज्यमंत्री म्हणाले, "मला वाटत नाही की त्यांच्या जीवाला धोका आहे. पण तरीही त्यांनी व्यक्त केलेल्या भीतीकडे लक्ष द्यायला हवे."

आज सकाळी सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुरक्षित ठेवण्याचे निर्देश राज्य पोलीस प्रमुखांना देण्यात आले आहेत.

भारत-पाक सामन्याला तीव्र विरोध; ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यभर ‘माझा देश, माझं कुंकू’ आंदोलन, टीव्हीची तोडफोड

डॉ. आंबेडकरांचे शिक्षणतत्त्व

आरक्षणाचा तोडगा की नव्या संघर्षाची बीजपेरणी?

आजचे राशिभविष्य, १५ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढत आज; दुबईत रंगणार मैदानातील महायुद्ध