महाराष्ट्र

"या गुन्हेगारांच्या राजवटीत नागरिकांना सुरक्षित कसे वाटेल?", गुन्ह्यांचा लेखाजोखा मांडत आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

"गेल्या दोन वर्षांत बनावट व्हॉट्सॲप मेसेजवरून अनेक दंगली उसळल्या आहेत. गुंड व्यवसायांना धमकावत आहेत. दुर्दैवाने, अत्यंत अक्षम आणि..."

Rakesh Mali

राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमधील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलिस स्टेशनमधील पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार केला. यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून राज्यात पोलीस आहेत का? असा सवाल केला जात आहे. असे असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुन्ह्यांचा लेखाजोखा मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी, या गुन्हेगारांच्या राजवटीत नागरिकांना सुरक्षित कसे वाटेल? असा सवालही केला आहे.

"महाराष्ट्र भाजप पुरस्कृत खोके सरकारने काबीज केला आहे. आता कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीची ही एक झलक", असे म्हणत आदित्य यांनी राज्यातील गुन्ह्यांची यादीच दिली आहे. त्यांनी त्यांच्या 'एक्स'हँडलवर याबाबतची पोस्ट केली आहे.

आदित्य यांनी ट्विट केलेल्या गुन्ह्यांची यादी-

1) काल रात्री एका भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात मिंधे टोळीच्या नेत्यांवर 5 गोळ्या झाडल्या.

2) गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत मिंधे टोळीच्या आमदाराने हातात बंदूक घेऊन मुंबईकरांना धमकावले. नंतर पोलीस ठाण्यात त्याच्या बंदुकीतून गोळीबार झाला. बॅलेस्टिक अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. या वागणुकीचे बक्षीस म्हणून त्यांना आता एका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.

3) मिंधे टोळीतील आमदाराचा मुलगा मुंबईतील एका व्यापाऱ्याचे अपहरण करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मुलगा नंतर होर्डिंग्जवर आणि कार्यक्रमांमध्ये दिसला, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

4) मिंधे टोळीतील आमदाराच्या माणसांनी उत्तर मुंबईत भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली, तर काहींना भाजपमधून बाहेर काढले जात आहे. स्थानिक भाजप नेत्याने (2022 पर्यंत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते) कार्यकर्त्यांची भेट घेतली पण पोलीस कारवाई झाली नाही.

5) कुटुंब खंडणीची मागणी मान्य करत नसल्यामुळे एक ब्रेनवॉश केलेला टोळीचा म्होरक्या त्याच्या मुलासह एका कुटुंबाला आणि एका मुलीला त्यांच्या घरात मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद झाला. कारवाई केली नाही.

6) ठाण्यात मिंधे टोळीच्या स्थानिक नेत्यांनी IVF उपचार घेत असलेल्या महिलेला मारहाण करून पोटात लाथ मारली, हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे बेकायदेशीर निर्लज्ज मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या सोशल मीडिया पोस्टसाठी आहे. पोलीस कारवाई नाही.

"गेल्या दोन वर्षांत बनावट व्हॉट्सॲप मेसेजवरून अनेक दंगली उसळल्या आहेत. गुंड व्यवसायांना धमकावत आहेत. दुर्दैवाने, अत्यंत अक्षम आणि निर्लज्ज बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे", असे आदित्य यांनी म्हटले आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश