महाराष्ट्र

मुंबईत आइस्क्रीममध्ये सापडलेलं बोट पुण्याच्या फॅक्टरीतील जखमी कर्मचाऱ्याचं? पोलिसांच्या हाती लागली महत्त्वाची माहिती

गेल्या आठवड्यात मुंबईतील मालाड येथे एका व्यक्तीने 'झेप्टो' ॲपद्वारे ऑर्डर केलेल्या 'यम्मो' कंपनीच्या आइस्क्रीम कोनमध्ये चक्क मानवी बोट सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

Swapnil S

गेल्या आठवड्यात मुंबईतील मालाड येथे एका व्यक्तीने 'झेप्टो' ॲपद्वारे ऑर्डर केलेल्या 'यम्मो' कंपनीच्या आइस्क्रीम कोनमध्ये चक्क मानवी बोट सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी आता पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे.

पुण्यातील ज्या फॅक्टरीत यम्मो आईस्क्रीमचे पॅकिंग झाले तेथील एक कर्मचारी जखमी असल्याचे पोलिसांना समजले असून त्याच्या हातावरही जखमा आहेत. आईस्क्रीममधील बोट याच व्यक्तीचे असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचा नमुना डीएनए चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतरच याबाबत ठोस काही सांगता येईल, असे पोलिसांचे (पुणे पोलिस) म्हणणे आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या दिवशी बोट असलेले आईस्क्रीम पॅक करण्यात आले त्याच दिवशी आईस्क्रीम पॅक करताना त्या व्यक्तीसोबत अपघात झाला. त्यामुळे तो त्याच व्यक्तीच्या बोटाचा तुकडा असावा, असा संशय पोलिसांना आहे. पण डीएनएचे नमुने जुळल्यानंतरच काहीही निश्चितपणे सांगता येईल. पुण्यातील इंदापूर तालुक्यात ही फॅक्टरी असून तेथे चौकशीदरम्यान एक कामगार जखमी असल्याचे पोलिसांना समजले होते. जखमेकडे पाहून त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. आता फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, यम्मो कंपनीचे आईस्क्रीम विविध ठिकाणावरून बनवून घेतले जातात, त्यापैकी ते इंदापुरातील फॉर्च्यून डेअरीमार्फत देखील बनवले जातात. या प्रकारानंतर भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण (FSSAI) संस्थेने फॉर्च्यून डेअरीचा परवाना रद्द केला आणि यम्मो आईस्क्रीमच्या वितरणावर बंदी आणली.

नेमका प्रकार काय?

ओर्लेम ब्रेण्डन सेराव (२७) यांनी झेप्टोद्वारे कोन आइस्क्रीम मागविले होते. आइस्क्रीम घरी येताच ओर्लेमने ते उघडून ताव मारण्यास सुरुवात केली खरी, पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. आइस्क्रीम खाताना त्यांच्या जिभेला काहीतरी टोचले, त्यामुळे आइस्क्रीममध्ये नक्की काय आहे हे पाहण्यासाठी त्यांनी ते बाहेर खेचले आणि त्यांना धक्काच बसला. आइस्क्रीममध्ये त्यांना दोन सेमी लांबीचा मानवी बोटाचा तुकडा आढळला. त्यानंतर ओर्लेम यांनी लगेच याची माहिती मालाड पोलीस ठाण्याला दिली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी