संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

शरद पवार कशासाठी कोणाला भेटतात माहीत नाही, छगन भुजबळ यांचे उद्गार; ८ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची ‘जनसन्मान’ यात्रा -तटकरे

शरद पवार कोणाला कशासाठी भेटतात, याबद्दल काही माहित नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : शरद पवार महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. मराठा आरक्षण, राज्यातील बिघडलेले वातावरण यावर सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन तोडगा काढावा, यासाठी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी सगळ्या पक्षातील नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मात्र शरद पवार कोणाला कशासाठी भेटतात, याबद्दल काही माहित नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. ओबीसीचे नुकसान होऊ नये, यासाठी पवारांनी मध्यस्थी करावी, हाच उद्देश असल्याचे भुजबळ म्हणाले. दरम्यान, राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असून त्या योजनांचा लाभ राज्यातील जनतेला मिळावा, जनतेच्या मनात काय आहे आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी जनसन्मान यात्रेचे आयोजन संपूर्ण राज्यात केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार थेट जनतेशी संवाद साधणार असून ही यात्रा ८ ऑगस्टपासून नाशिकच्या दिंडोरी येथून सुरू होईल.

१५ ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्राची यात्रा सुरू होईल. ती २२ ऑगस्टपर्यंत मुंबईत येईल. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी विदर्भातून सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा सलग पाच दिवसाचा दौरा आहे. यामध्ये दिंडोरी, देवळाली, निफाड, येवला, सिन्नर, अहिल्यानगरमधील कोपरगाव, चांदवड, कळवण, धुळे शहर, अमळनेर, मालेगाव (मध्य) या विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. या यात्रेमध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान, सर्वसामान्य जनतेशी संवाद हा महत्त्वाचा भाग असणार आहे. या यात्रेत प्रत्येक दिवशी संध्याकाळी महायुतीतील मित्रपक्षांच्या प्रमुखांशी संवाद साधणार आहोत. महायुतीमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे ही यामागची भूमिका आहे असेही सुनील तटकरे यांनी हेही आवर्जून स्पष्ट केले.

पहिल्या पाच दिवसांनंतर सलग पाच दिवस पुणे जिल्ह्यातील वडगावशेरी, हडपसर, मावळ, पिंपरी, खेड आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर या विधानसभा मतदारसंघात तर त्यानंतर मुंबई उपनगरमधील बांद्रा ईस्ट, कुर्ला, मानखुर्द-शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, ठाणे जिल्ह्यातील ऐरोली, मुंब्रा-कळवा, भिवंडी ईस्ट, शहापूर या मतदारसंघांनंतर विदर्भातील नागपूर वेस्ट, काटोल, सावनेर, रामटेक, भंडारा, तुमसर, गोंदिया, अर्जुनी मोरगाव, ब्रम्हपुरी, गडचिरोली, अहेरी या मतदारसंघांत ही यात्रा जाणार आहे, असे तटकरे म्हणाले.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत