संग्रहित फोटो
महाराष्ट्र

मी महाराष्ट्रात फिरणारच - अजित पवार

महाराष्ट्रातील बहिणींनी बांधलेल्या राख्यांनी जे काही संरक्षण दिले आहे. हे राखीचे सुरक्षाकवच आणि प्रेमाची ढाल कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्रातील बहिणींनी बांधलेल्या राख्यांनी जे काही संरक्षण दिले आहे. हे राखीचे सुरक्षाकवच आणि प्रेमाची ढाल कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे, मी महाराष्ट्रात फिरणार, जीवाला धोका आहे की नाही याचा मी विचार करत नाही, पोलिसांनी त्याची काळजी घ्यावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

तळेगाव दाभाडे येथील जनसंवाद सभेत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, अलीकडे गुप्तचर विभागाने मला एक निरोप पाठविला की माझ्या जीवाला धोका आहे. परंतु, मी महाराष्ट्रात फिरणार, जीवाला धोका आहे की नाही याचा मी विचार करत नाही, पोलिसांनी त्याची काळजी घ्यावी. महाराष्ट्रातील बहिणींनी बांधलेल्या राख्यांनी जे काही संरक्षण दिले आहे. हे राखीचे सुरक्षाकवच आणि प्रेमाची ढाल कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही. कारण, आम्ही कोणाचे वाईट केले नाही. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेऊन काम केले. सरकारमध्ये असल्याने गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण देऊ शकलो.

दरम्यान, मुले होताना देवाची, अल्लाहाची काही कृपा नसते. नवऱ्याची कृपा असते म्हणून मुले होतात. लहान कुटुंब ठेवले तर योजनांचा फायदा होईल. मुलांना चांगले शिक्षण देऊ शकाल. स्वत:चे जीवन चांगल्या पद्धतीने जगता येईल. त्यामुळे सर्वांनी दोन मुलांवर थांबावे, असे आवाहन उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी केले.

गुलाबी रंग महिलांना आवडतो म्हणून मलाही आवडायला लागला. यात चुकीचे काय आहे. आम्ही वेडेवाकडे तर करत नाही ना? महिला लग्नात देखील इतक्या सुंदर दिसत नव्हत्या. इतक्या फेट्यात दिसत आहेत. नवरे देखील ओळखायचे नाहीत. फेटा घरी जाईपर्यंत काढू नका, फेटा घातल्यावर कोण कसा दिसतो, हे नवऱ्याला विचारा असेही ते उपस्थित महिलांना उद्देशून म्हणाले.

तेल कंपन्यांकडून इंधन गुणवत्ता तपासणीत मोठी वाढ; सोशल मीडियावरील चर्चेची इंधन वितरण कंपन्यांकडून खबरदारी

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Driving Licence : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक होणार? जाणून घ्या नवे नियम

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद