संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

पावसात भिजा नाही तर उन्हात झोपा, मत मिळणार नाही! मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

आता तुम्ही पावसात भिजा नाही तर उन्हात झोपा, मराठा समाज एकाही पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवारांसह सर्वपक्षीय नेत्यांना दिला.

Swapnil S

सोलापूर : आता तुम्ही पावसात भिजा नाही तर उन्हात झोपा, मराठा समाज एकाही पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवारांसह सर्वपक्षीय नेत्यांना दिला. सोलापूर येथील शांतता रॅलीत मनोज जरांगे पाटील यांनी सर्व पक्षातील नेत्यांवर हल्लाबोल केला.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी सोलापुरात शांतता रॅली काढली. या रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीरसभा झाली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पुढील टप्पा बुधवारपासून सुरू होत असून त्याची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून करण्यात आली आहे.

भाजपमधील मराठे नेते हे जर खरे मराठे असतील तर ते मराठा समाजाच्या बाजूनेच बोलतील. मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने ते बोलणार नाहीत, अशी टीका त्यांनी भाजप नेत्यांवर केली. आम्ही आमच्या जातीलाच बाप मानतो आणि तुम्ही तुमच्या नेत्याला बाप मानतात. हा तुमचा आणि आमच्या संस्कारातील फरक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मराठा समाजातील आंदोलकांवर देवेंद्र फडणवीस यांनी गोळ्या झाडल्या. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात बोलतो. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जातिवंत मराठा यापुढे घरात बसू शकत नाही. स्वतःच्या लेकराच्या आणि जातीच्या बाजूने मराठा समाज उभे राहणार आहे. त्यामुळे मराठे आता कोणत्याच पक्षाचा प्रचार करणार नाही, असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले.

राणे, भुजबळ यांना केले लक्ष्य

कोकणातला एक नेता भिंतीकडे पाहून बोलतो, अशी टीका जरांगे पाटील यांनी नारायण राणेवर केली. मी मॅनेज होत नाही म्हणून विरोधकांकडून माझी बदनामी केली जात आहे. ९६ कुळी मराठा समाजाला बोलणारा तू कोण? असा प्रतिप्रश्न करीत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही हल्लाबोल केला.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन

बराक ओबामांच्या Favourite Songs 2025 यादीत मराठमोळे ‘पसायदान’; जयंत पाटील म्हणाले, "आध्यात्मिक विचार जागतिक पातळीवर...

"हा अवॉर्ड आईसाठी!" जीवनातला पहिला-वहिला पुरस्कार स्वीकारताना आर्यन खानची प्रतिक्रिया; गौरी खाननेही खास पोस्ट करत केले कौतुक