प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचे रॅगिंग; पाच विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल

राज्यातील अग्रगण्य विधी शिक्षण संस्था असलेल्या पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजमध्ये रॅगिंगचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे.

Krantee V. Kale

पुणे : राज्यातील अग्रगण्य विधी शिक्षण संस्था असलेल्या पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजमध्ये रॅगिंगचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. एका ३५ वर्षीय विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनंतर डेक्कन पोलीस ठाण्यात पाच विद्यार्थ्यांविरुद्ध महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी हा विधी शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत असून महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहतो. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित पाच विद्यार्थ्यांनी त्याला सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. त्याच्या रूमच्या दरवाजाबाहेर अंडी फोडणे, दरवाजावर अपमानकारक मजकूर लिहिणे, शिवीगाळ करणे आणि अपमानास्पद वागणूक देणे असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू होते.

तक्रारदाराचे आरोपींवर आरोप

तक्रारदार यांनी असा आरोप केला आहे की, ‘वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या चालतात, याची माहिती मी प्रशासनाला दिली असा संशय या विद्यार्थ्यांना होता. त्या रागातून त्यांनी मला लक्ष्य केले. टोळक्याने येऊन शिवीगाळ करणे आणि मानसिक छळ करणे यामुळे मी खचलो होतो.' तक्रारदार यांनी कॉलेज परिसरातील असुविधा, बंद असलेले कॅन्टीन आणि मैदानांचा गैरवापर यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधीपासून? सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली महत्त्वाची माहिती

­सरकारची रिक्षा-टॅक्सीचालकांना मुदत देण्याची तयारी; परिवहन अधिकाऱ्यांसोबत आज बैठक - सरनाईक

Mumbai : राज्य आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या चार हजार एकर जमिनीवर अतिक्रमण

संमतीने संबंध असतील तर गुन्हा कसा ठरतो? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

शाळा सुटली...कडक उन्हाळ्यामुळे सर्व शाळांना सुट्टी जाहीर