महाराष्ट्र

तोतया ‘एअरमन’ जेरबंद; हवाई दलाचा युनिफॉर्म परिधान करून फसवणूक

हवाई दलाचा युनिफॉर्म परिधान करून फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स आणि खराडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या तोतया 'एअरमन'ला जेरबंद केले. गौरव कुमार दिनेश कुमार (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Krantee V. Kale

पुणे : हवाई दलाचा युनिफॉर्म परिधान करून फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स आणि खराडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या तोतया 'एअरमन'ला जेरबंद केले. गौरव कुमार दिनेश कुमार (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी गौरव कुमार हा सध्या खराडी येथील वरद विनायक अपार्टमेंट, थिटे वस्ती येथे राहत होता. त्याचे मूळगाव उत्तर प्रदेशातील अलिगड येथे आहे. खराडी परिसरातील एका हॉटेलमध्ये तो काम करत असल्याची माहिती आहे. आरोपी हवाई दलाचा गणवेश घालून विविध ठिकाणी वावरत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी आरोपीच्या घरातून हवाई दलाचे टी-शर्ट, कॉम्बॅट पँट, शूज, बॅजेस आणि ट्रॅकसूट जप्त केले आहेत. तपासणी दरम्यान, त्याच्याकडे २०२० सालचे एक बनावट ओळखपत्रही आढळून आले. त्याच्या मोबाईल फोनमध्ये त्याला हवाई दलाच्या लढाऊ विमानांसोबत, परमेश्वरन हॉल आणि प्रतिबंधित लष्करी परिसरांमध्ये काढलेले फोटो सापडले. तसेच, तो सोशल मीडियावरही हवाई दलाचा युनिफॉर्म घालून स्वतःला अधिकारी भासवत असल्याचे उघड झाले आहे.

चौकशीदरम्यान, आरोपीने एक महिन्यापूर्वी हवाई दलाचा जुना गणवेश जाळून टाकल्याची कबुली दिली आहे. पहलगाम हल्ला आणि भारतीय सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क असताना ही अटक करण्यात आली आहे.

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन; कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल, १ तास लोकलसेवा विस्कळीत

ऑनलाइन बेटिंग प्रकरण : शिखर धवन आणि सुरेश रैनाला ED चा दणका; ११.१४ कोटींची मालमत्ता जप्त

बुलढाणा हादरले! दारूच्या नशेत मुलाने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; नंतर स्वतःलाही संपवलं

Pune : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; दोन अधिकाऱ्यांचे निलंबन, चौकशी समितीची स्थापना

बिहारमध्ये तणाव वाढला! उपमुख्यमंत्री विजय सिन्हांच्या ताफ्यावर हल्ला; RJD वर आरोप करत म्हणाले - “यांच्या छातीवर बुलडोझर..."