महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात महायुतीचेच वारे; दिग्गज प्रस्थापितांचा धुव्वा; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह माजी मंत्री बाळासाहेब पाटील पराभूत

Maharashtra Assembly Elections Results 2024 : सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी भागातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आ. जयकुमार गोरे यांनी चौथ्यांदा ९ हजार ४७८ मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा त्यांनी दारुण पराभव केला आहे.

Swapnil S

रामभाऊ जगताप/ सातारा

सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी भागातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आ. जयकुमार गोरे यांनी चौथ्यांदा ९ हजार ४७८ मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा त्यांनी दारुण पराभव केला आहे.

माण-खटाव विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना १ लाख ४८ हजार १९५ मते पडली आहेत तर ९८ हजार ७१७ मते प्रभाकर घार्गे यांना पडली आहेत. या मतदारसंघात निवडणुकीत घार्गे यांच्या पाठीशी मोठ्या नेत्यांची ताकद उभी होती. पण, येथे आघाडीतील नाराज शेखर गोरे आता बंधू विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्यासोबत गेले. शेखर गोरेंनी बंधू जयकुमार गोरे यांचा प्रचार देखील केला आणि दोन्ही गोरे बंधूंनी घार्गे यांचा 'करेक्ट' कार्यक्रमी केला.

जयकुमार गोरे यांचा आमदारकीचा चौकार

माण विधानसभा मतदारसंघात २००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी जयकुमार गोरे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपात ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला होता. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. २०१४ ची विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्याने काँग्रेसकडून जयकुमार गोरे आमदार झाले होते. भाजपच्या चिन्हावर २०१९ ची विधानसभा निवडणूक जयकुमार गोरे यांनी लढवली आणि ते विजयी झाले. सन २०२४ ची निवडणूक त्यांची चौथी निवडणूक होती. या निवडणुकीत जयकुमार गोरे यांनी विजय मिळवत चौकार मारला आहे.

फलटणात सचिन कांबळे-पाटील, तर कोरेगावात महेश शिंदेंनी मिळवला विजय

फलटणमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन कांबळे पाटील यांनी १ लाख १९ हजार २८७ मिळवला १७ हजार ०४६ मताधिक्याने विजय मिळवला असून दीपक चव्हाण यांना १ लाख ०२ हजार २४१ मते पडली आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांचा दारुण पराभव केला आहे. या ठिकाणी महेश शिंदे यांना १ लाख ४६ हजार १६६ मते पडली असून शशिकांत शिंदे यांना १ लाख ०१ हजार १०३ मते मिळाली आहेत. त्यामुळे महेश शिंदे यांनी ४५ हजार ०६३ मताधिक्य घेत विजय मिळवला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन शिंदेंमध्ये लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात होते, तर त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांनी शड्डू ठोकला होता. कोरेगाव मतदारसंघात यंदाही कांटे की टक्कर पाहायला मिळाली. मागील निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा शिवसेनेकडून मैदानात उतरलेल्या महेश शिंदे यांनी पराभव केला. याहीवेळेस शशिकांत शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, फलटण विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार दीपक चव्हाण चौकार ठोकण्याच्या तयारीत होते. दीपक चव्हाण हे फलटणचे विद्यमान आमदार असले तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर हेच फलटणचे किंगमेकर राहिलेले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन कांबळे यांनी आव्हान उभे होते. पण, या मतदारसंघात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा करिष्मा काही पहायला मिळाला नाही आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी कस लावत उमेवार निवडून आणला. दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली होती.

बाळासाहेब पाटील सहाव्या टर्ममध्ये पराभूत

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची फेररचना होण्यापूर्वी १९९९, २००४ या विधानसभा निवडणुकांमध्ये बाळासाहेब पाटील विजयी झाले होते तर, २००९ ला मतदारसंघांची फेररचना झाली होती. त्यानंतरच्या पुढील तीन निवडणुका बाळासाहेब पाटील यांनी जिंकल्या. २००९ ला राष्ट्रवादी काँग्रेसने बाळासाहेब पाटील यांच्याऐवजी अतुल भोसले यांना उमेदवारी दिली होती. मात्र, बाळासाहेब पाटील यांनी ती निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि जिंकली. त्यानंतरच्या दोन निवडणुका बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिंकल्या होत्या. मात्र, यावेळेस बाळासाहेब पाटील यांचा मनोज घोरपडे यांनी चांगलाच दारुण पराभव केला.

पाटणमध्ये पुन्हा शंभूराज देसाई

पाटण विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा साताऱ्याचे पालकमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या ठिकाणी अपक्ष म्हणून सत्यजित पाटणकर तर उद्धवसेनेचे हर्षद कदम यांनी मंत्री देसाई यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. मात्र, या ठिकाणी त्यांचा फारसा प्रभाव पाडता आला नाही आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ३४ हजार ८२४ ताधिक्य मिळवले.

कराड उत्तरमध्ये २५ वर्षांनंतर परिवर्तन! मनोज घोरपडे विजयी, तर बाळासाहेब पाटील पराभूत

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र शरद पवार गटाकडून राज्याचे माजी सहकार मंत्री व विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे मनोज घोरपडे असा सामना रंगला. बाळासाहेब पाटील आतापर्यंत पाच वेळा कराड उत्तरचे आमदार राहिले होते. मात्र, यावेळेस त्यांचा महायुती भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी दारुण प्राभाव केला आहे. उत्तरेत पंचवीस वर्षे असणारी बाळासाहेब पाटील यांच्या सत्तेला मनोज घोरपडे यांनी सुरुंग लावला आहे. या ठिकाणी मनोधैर्य एकवटल्याने हे शक्य झाले असून या कराड उत्तर मतदार संघात कमळ फुलले आहे. कराड उत्तर विधानसभा निवडणुकीत मनोज घोरपडे यांना एकूण १ लाख ३३ हजार ३६५ मते पडली तर बाळासाहेब पाटील यांना ८९ हजार ८१४ मते पडली.

वाईत पुन्हा मकरंद आबांचा विजय

सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविल्यामुळे जिल्ह्यात शरद पवार आणि काँग्रेसचा एकेकाळचा गड ढासळला असून महायुतीचाच बालेकिल्ला तयार झाला आहे. भाजपच्या चार, शिंदेसेनेच्या दोन आणि अजित पवार गटाने दोन जागांवर विजय मिळवत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील विजयापर्यंत पोहोचू दिले नाही. वाई विधानसभा मतदारसंघातही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मकरंद पाटील यांनी ५० हजारांहून अधिकचे मताधिक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ यांचा पराभव केला आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले