महाराष्ट्र

नवीन महाबळेश्वरमध्ये आणखी २९४ गावांचा समावेश; जिल्ह्यातील 'या' ३ तालुक्यांतील गावांचा प्रस्ताव सरकारकडे

नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्रात समाविष्ट केलेल्या २३५ गावांच्या अधिसूचित क्षेत्रानजीक असलेल्या आणखी २९४ गावांचाही या प्रकल्पात नव्याने समावेश करण्यात येणार आहे.

Swapnil S

कराड : नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्रात समाविष्ट केलेल्या २३५ गावांच्या अधिसूचित क्षेत्रानजीक असलेल्या आणखी २९४ गावांचाही या प्रकल्पात नव्याने समावेश करण्यात येणार आहे. या २९४ गावांचे एकूण क्षेत्रफळ ९४४ चौ. किमी आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाच्या शेजारीच कोयना बॅकवॉटरला लागून असलेल्या नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पात नव्याने २९४ गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. मंजुरी मिळाल्यास सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, सातारा, जावळी या तालुक्यांतील ५२९ गावांसाठी एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे. सातारा जिल्ह्यातील २३५ गावांतील ११५३ चौ. किमी क्षेत्रफळावर हे गिरिस्थान उभारण्यासाठी प्रारूप विकास आराखडा यापूर्वीच नागरिकांच्या सूचना, हरकतींसाठी एमएसआरडीसीने जाहीर केला आहे. तो लवकरच अंतिम केला जाणार आहे. या २३५ गावांमध्ये रोपवे, घाटमाथा रेल्वे, सायकल ट्रॅक, फ्युनिक्यूलर रेल्वे यांच्या विकासासह टुरिस्ट पॅराडाइज, पर्यटन आणि निसर्गसंपदा विकास केंद्र प्रस्तावित केले आहे. त्यातून तेथे पर्यटनाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

यापूर्वी नवीन महाबळेश्वर गिरिस्थानात समाविष्ट केलेल्या २३५ गावांच्या अधिसूचित क्षेत्रानजीक असलेल्या २९४ गावांचाही या प्रकल्पात नव्याने समावेश करण्यात येणार आहे. या २९४ गावांचे एकूण क्षेत्रफळ ९४४ चौ. किमी आहे.

सातारा जिल्ह्यातील या गावांचा होणार समावेश

सातारा जिल्ह्यातील यवतेश्वर, पाटेघर, रेवळी, परळी, नुणे, रोहोत, सरखाल, भांबावळी, चिंचणी, दरे बुद्रुक, धावडशी, कळंबे, कामठीतर्फे सातारा, कान्हेर, करंजे तर्फे परळी, आंबावडे बु. आगुडेवाडी या गावांचा समावेश होणार आहे.

पाटण तालुक्यातील 'ही' गावे समाविष्ट

झाकडे, विहे, करंजवडे, येरफळे, तोरणे, साळवे, सांबूर, शिंदेवाडी, शिरशिंगे, तळीये, तेलेवाडी, नवजा, नाटोशी, निवडे, रोहिने, मारूळ हवेली, मुरूड, म्हावशी, मणेरी, गोकुळ तर्फे हेळवाक, जरेवाडी, काळगाव, डिचोळी, दिवाशी खुर्द, बाणपुरी, चाळकेवाडी.

जावळीतील १६ गावे नवीन महाबळेश्वरात

मालदेव, मेट इंदवली, मोहाट, पाली तर्फे तांब, ताकवली, तांबी, वासोटा, आडोशी, अंबेघर तर्फे मेढा, भणंग, गवडी, जुंगटी, खिरखंडी, कुसापुर, कुसवडे, माडोशी.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन