ANI
महाराष्ट्र

संजय राऊतांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ ; १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने 31 जुलै रोजी अटक केली होती. 8 दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती

वृत्तसंस्था

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. संजय राऊत यांना आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. याप्रकरणी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

पत्राचाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने 31 जुलै रोजी अटक केली होती. 8 दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ईडीची कोठडी संपल्यानंतर राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेथे ईडीने त्यांची कोठडी मागितली नाही, त्यामुळे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर संजय राऊत यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. न्यायालयाने संजय राऊत यांना आर्थर रोड कारागृहात घरचे जेवण आणि औषध देण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनाही पत्राचाळ आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने समन्स बजावले होते. त्यांचीही चौकशी करण्यात आली. संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी पुन्हा वाढवून १९ सप्टेंबरपर्यंत तुरुंगवास वाढवला. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांचा थेट सहभाग असल्याचेही ईडीने आरोप केला आहे

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत