महाराष्ट्र

भारत विकास परिषदेचे अधिवेशन मुंबईत

देशाच्या विविध भागातून येणारे भारत विकास परिषदेचे शेकडो कार्यकर्ते त्यांच्या संस्थेच्या आणि भारताच्या विकासासंदर्भात सेवा आणि मूल्यांच्या विविध पैलूंवर विचारमंथन करतील.

Swapnil S

मुंबई : भारताच्या सर्वांगीण विकासासाठी १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी भाईंदर पश्चिम येथील केशव सृष्टी येथे भारत विकास परिषदेचे अधिवेशन होत आहे. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्क प्रमुख रामलाल यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन होणार असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजेंद्र सिंह संधू यांनी प्रेस क्लब येथे शुक्रवारी दिली.

देशाच्या विविध भागातून येणारे भारत विकास परिषदेचे शेकडो कार्यकर्ते त्यांच्या संस्थेच्या आणि भारताच्या विकासासंदर्भात सेवा आणि मूल्यांच्या विविध पैलूंवर विचारमंथन करतील. या दोन दिवसीय बैठकीत विविध सत्रांमध्ये अनेक विषयांवर विचारमंथन होणार आहे. परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस शाम शर्मा म्हणाले की, भारत विकास परिषद १० जुलै १९६३ रोजी अंकुरलेली ही संस्था, राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असलेली १५१७ शाखांमध्ये ७५ हजारहून अधिक कुटुंब सदस्य आहेत.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये आणि देशभक्ती जागृत करण्यासाठी, 'देशभक्तीपर गीतांचे सामूहिक गायन' स्पर्धा, 'भारत जाणून घ्या' स्पर्धा आणि 'गुरु वंदन - विद्यार्थी अभिनंदन' यासारखे कार्यक्रम आयोजित केले असून, परिषदेमार्फत देशभरात राबविण्यात येत असलेल्या ॲनिमियामुक्त भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागातील व वंचित वस्त्यांमध्ये मोफत तपासणी शिबिरांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलवादी? विधानसभेत आमदार मनीषा कायंदे काय म्हणाल्या? बघा Video

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल