एक्स @mpprataprao
महाराष्ट्र

प्रभावी आयुर्वेदासाठी संशोधनाची व्याप्ती वाढवणार; केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन

आयुर्वेद सर्व प्रकारच्या व्याधींवर परिणामकारक उपचारपद्धती आहे. आयुर्वेदाला जगभर सर्वमान्यता मिळू लागली आहे.

Swapnil S

पुणे : आयुर्वेद सर्व प्रकारच्या व्याधींवर परिणामकारक उपचारपद्धती आहे. आयुर्वेदाला जगभर सर्वमान्यता मिळू लागली आहे. प्रभावी आयुर्वेदासाठी संशोधनाची व्याप्ती वाढवण्यासह इनोव्हेशन व स्टार्टअप सुरू करण्यासाठी आयुष मंत्रालयामार्फत चालना देणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. सर्वगुणकारी आयुष औषध सहज उपलब्ध होण्यासाठी देशभरात आयुष औषधी केंद्रांचे जाळे उभारण्यात येणार असल्याचेही प्रतापराव जाधव यांनी नमूद केले.

डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठ संचालित डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे, यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथील ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेस, नेदरलँड येथील इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाऊंडेशन व इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद यांच्या सहकार्याने आयोजित आठव्या इंटरनॅशनल आयुर्वेद काँग्रेसचे (आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन) उद्घाटन प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले.

संमेलनामध्ये जागतिक स्तरावर आयुर्वेद प्रसारासाठी डॉ. गुणवंत येवला आणि डॉ. वॉल्टर मोईल्क यांना 'आयुर्वेद धन्वंतरी पुरस्कार' प्रदान करण्यात आला. आयुर्वेदातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. संजीव गोयल, डॉ. अखिलेश वर्मा, डॉ. एस. एन. पांडे, डॉ. रामदास आव्हाड यांना सन्मानित करण्यात आले. दहा देशांतील १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि १२०० हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील संशोधक, वैद्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी या संमेलनात सहभागी झाले होते. ५०० हून शोधनिबंध सादर झाले.

प्रतापराव जाधव म्हणाले की, "योग व आयुर्वेद ही भारताची ओळख आहे. शंभराहून अधिक देशांत आज आयुर्वेद पोहोचला आहे, तर १८० देशांत योगदिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आयुर्वेदीक औषधांना, उपचारांना प्रभावी करण्यासाठी व मान्यता मिळण्यासाठी सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. त्यामुळेच संशोधनावर भर दिला जात आहे. डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयांसारख्या संस्थांमध्ये संशोधन व विकास केंद्राची उभारणी करण्याचा विचार सुरू आहे. अनेक औषधांना आयएसओ मानांकन दिले जात आहे. देशातही घराघरात आयुर्वेद जाण्यासाठी 'देश का प्रकृती परीक्षण' उपक्रम आणला असून, त्यामध्ये सव्वाकोटी लोकांची माहिती संकलित केली आहे.

विचारांचे आदानप्रदान

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, देशातील पहिले आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन पुण्यात आणि तेही आमच्या संस्थेत होतेय, याचा आनंद आहे. जगभरातील आयुर्वेदतज्ज्ञ, विद्यार्थी येथे आल्याने विचारांचे आदानप्रदान होत आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये आयुर्वेदाचा समावेश ही चांगली बाब आहे. वैदिक संस्कृती, आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाऊल स्वागतार्ह आहे.

Thane : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील दुकानातील मिठाईतून विषबाधा? पाच जणांची प्रकृती बिघडली, एकाचा मृत्यू, FDA कडून तपास सुरू

Diljit Dosanjh Indore Concert : दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास, दोघांना अटक

भंडाऱ्यात लालपरीचा अजब कारभार; रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना अर्ध्या रस्त्यात उतरवलं, पालकांचा संताप, चालक-वाहक निलंबित

Raigad Fire : उरणमध्ये केमिकलच्या गोदामाला भीषण आग! मोठ्या स्फोटाने परिसर हादरला; धुराचे लोट हवेत, VIDEO

छठपूजेचा प्रसाद खाल्ल्याने आईचा संताप अनावर; चार वर्षांच्या चिमुरडीला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू