मुंबई : नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पाहणी केली. ही पाहणी म्हणजे इव्हेंट आणि जाहिरातबाजीवर ४००-४०० कोटींचा खर्च, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. दरम्यान, अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
मराठवाडा आणि विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या भागात जाऊन पाहणी केली खरी पण ही पाहणी केवळ 'इव्हेंट' नसावा अशी आमची माफक अपेक्षा आहे. इव्हेंट आणि जाहिरातींसाठी हे सरकार ४००-४०० कोटी रुपये खर्च करत आहे, असे पाटील म्हणाले.