महाराष्ट्र

चौल ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन; केंद्रीय मंत्री अनंत गीते, आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मानांकन प्रमाणपत्र प्रदान

Swapnil S

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चौल ग्रुप ग्रामपंचायतीला आयएसओ (ISO) मानांकन मिळाल्यामुळे चौल ग्रामपंचायतीचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यात आले. आयएसओ लिड ऑडिटर किरण भगत यांच्या हस्ते हे मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

शासन व्यवहारात पारदर्शकता तसेच गतिमानता यावी, यासाठी ई-गव्हर्नन्सचा वापर केला जात आहे. ग्रामपंचायतीमधील विविध रजिस्टर्स, फॉम्स, दस्तावेजांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतींकडे वाटचाल सुरू आहे. बदलत्या परिस्थितीत ग्रामपंचायतींची कार्यपद्धतीचे पुनर्विलोकन करून व्यवसाय प्रक्रिया पुनर्निर्मित करण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय कामकाज कार्यक्षम व्हावे आणि कार्यपद्धतीत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी आयएसओ प्रमाणिकरण करण्यात येत आहे.

यावेळी शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, विधान परिषद आमदार जयंत पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अस्वाद पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना तालुका प्रमुख शंकर गुरव, शिवसेना जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, तालुका संघटिका स्नेहल देवळेकर, शिवसेना युवासेना जिल्हा अधिकारी अमिर ठाकूर, नागाव ग्रामपंचायत सरपंचा हर्षदा निखिल मयेकर, चौल ग्रामपंचायत सरपंचा प्रतिभा पवार, उपसरपंच अजित गुरव, ग्रामसेविका ऋतिका पाटील व सर्व चौल ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

शासकीय योजना राबविण्यावर भर

चौल ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभीकरण, ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्यावत ठेवणे, स्वच्छतागृहे बांधणे, गावात साफसफाई करणे, गावात व्यायामशाळा, स्वच्छ पाणीपुरवठा करणे, घरपट्टी पाणीपट्टी वसुली, ग्रामसभेत नियमित विषयांवर चर्चा, गावात वृक्षारोपण करणे यासह इतर शासकीय योजना राबविण्यावर भर देण्यात आले, तर ग्रामपंचायतीचे सर्व नियम रितसर असल्यामुळे चौल ग्रामपंचायतीत आयएसओ मानांकन देऊन मानाचा तुरा रोवला गेला. चौल ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विकासकामाचा कायम पाठपुरावा माजी राजीप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी करून गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळे ग्रामपंचायतीला मिळालेल्या आयएसओ मानांकनाचे श्रेय म्हात्रे यांना भाषणाच्या वेळी देण्यात आले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त