महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवारांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडेंच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे (Sharad Pawar) निकटवर्तीय आणि सिटी ग्रुपचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांच्या पुण्यातील कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली

प्रतिनिधी

बीबीसीच्या (BBC) कार्यालयांवर आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारीवरून राजकारण तापले असतानाच आता पुण्यातील एका उद्योजकाच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. सिटी ग्रुपचे (City Group) अध्यक्ष आणि अ‍ॅमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे (Anirudha Deshpande) यांच्या घरावर आणि पुण्यातील कार्यालयावर आज पहाटे आयकर विभागाने धाड टाकली. अनिरुद्ध देशपांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे आता महाराष्ट्राचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेपासून अनिरुद्ध देशपांडे यांच्या घराची आणि कार्यालयाची झाडाझडती सुरु करण्यात आली. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याचे स्पष्टीकरण यावेळी आयकर विभागाकडून देण्यात आले आहे. अनिरुद्ध देशपांडे हे शरद पवारांचे निकटवर्तीय तर आहेतच. शिवाय अनेक बड्या राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या कार्यालयावर पडलेल्या या छापेमारीमुळे पुण्यातील उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे.

१० महिन्यांचा संसार, नवऱ्याचे अनैतिक संबंध, शेवटी टोकाचं पाऊल; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या

चोरीच्या संशयावरून १४ वर्षाच्या मुलासोबत राक्षसी कृत्य; लोखंडी बैलगाडीला बांधलं, खालून आग लावली, धुळ्यातील संतापजनक घटना

शाळा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी दिलासा देणार; शालेय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन; एसटी बस रद्द झाल्यास मिळणार तत्काळ मदत

ठाण्यातील मतदार यादीत घोळ; साडेचार लाख मतदार वाढले कसे? - मनसेचा आरोप; निवडणूक अधिकारी लग्नात व्यस्त

आज होणाऱ्या TET परीक्षेसाठी ४ लाख ७५ हजारांहून अधिक नोंदणी; गैरप्रकार रोखण्यासाठी CCTV सह Ai तंत्रज्ञानाचा वापर