महाराष्ट्र

आघाडीचा डाव, युतीचा प्रतिडाव; कुरघोडीचे राजकारण जोरात, पवारांवर महायुती भारी!

पुरंदरचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी तर थेट अजित पवारांच्याच विरोधात शड्डू ठोकला आहे. त्यातच रासपचे महादेव जानकर यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचे संकेत दिल्याने महायुतीसमोर माढा आणि बारामतीत आव्हान उभे ठाकण्याची शक्यता होती. कारण या दोन्ही मतदारसंघात धनगर समाजाची संख्या मोठी आहे.

Swapnil S

विशेष प्रतिनिधी/मुंबई : राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाची देशभर चर्चा आहे. कोणत्याही परिस्थितीत या लोकसभा मतदारसंघावर झेंडा फडकावून शरद पवार यांना धक्का द्यायचाच, यासाठी महायुतीने चंग बांधला आहे. त्यातच शरद पवार यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपला जाऊन मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. परंतु शरद पवार यांनी मतदारसंघात नव्याने बांधणी करून जातीय समीकरणे जुळविण्याचे काम करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून रासप नेते महादेव जानकर यांना माढ्यात पाठिंबा देऊन बारामतीसाठी वाट सुकर केली होती. मात्र, यावर कुरघोडी करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकर यांना आपल्याकडे वळविले. यासोबतच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यात दिलजमाई करून फडणवीसांनी पवार यांना दुसरा धक्का दिला. त्यामुळे पवारांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

शरद पवार यांच्यासाठी बारामतीची जागा अत्यंत प्रतिष्ठेची आहे. अर्थात यावरच शरद पवार गटाचे पुढील राजकीय समीकरणे जुळून येण्यास मदत होणार असून, त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांचेही राजकीय भवितव्य याच विजयावर अवलंबून आहे. त्यामुळे ही लढत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भाजपने बारामती मतदारसंघात बरेच प्रयोग केले आहेत. परंतु आतापर्यंत एकदाही बारामती सर करता आलेली नाही. त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीत बारामती जिंकायचीच, असा निश्चय भाजप नेत्यांनी केला असून, त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फोडाफोडीचे राजकारण करून अजित पवार गट भाजपने आपल्यासोबत घेतला. त्यामुळे आता बारामती सहज काबीज करणे शक्य आहे, असे भाजपला वाटते. परंतु अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले जात असल्याने अजित पवार यांच्यावरील नाराजी उफाळून आली. त्यातल्या त्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा अजित पवारांवर राग आहे. तसेच पुरंदरचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी तर थेट अजित पवारांच्याच विरोधात शड्डू ठोकला आहे. त्यातच रासपचे महादेव जानकर यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचे संकेत दिल्याने महायुतीसमोर माढा आणि बारामतीत आव्हान उभे ठाकण्याची शक्यता होती. कारण या दोन्ही मतदारसंघात धनगर समाजाची संख्या मोठी आहे.

भोरचे कॉंग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या कारखान्याला कर्ज हमी देऊन त्यांनाही चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.

फडणवीसांचा उलटा फास

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या विरोधात उलटा फास टाकायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी महादेव जानकर यांना थेट वर्षा बंगल्यावर बोलावून त्यांची समजूत काढली आणि त्यांना परत महायुतीत घेतले. त्यानंतर त्यांनी माजी मंत्री तथा इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना थेट सागर बंगल्यावर बोलावले आणि अजित पवार यांच्याविषयीची त्यांची नाराजीही संपुष्टात आणली. त्यामुळे बारामतीतील महायुतीतील अंतर्गत विरोध जवळपास मावळल्यात जमा आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी