Jalgaon : तरुणीच्या अन्ननलिकेत अडकली पिन; १८ वर्षीय तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

Jalgaon : तरुणीच्या अन्ननलिकेत अडकली पिन; १८ वर्षीय तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया

दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी सेफ्टी पिनचा वापर करणे एका १८ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती. दात स्वच्छ करताना चुकून सेफ्टी पिन गिळली गेल्याने ती अन्ननलिकेत अडकली...

Swapnil S

जळगाव : दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी सेफ्टी पिनचा वापर करणे एका १८ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती. दात स्वच्छ करताना चुकून सेफ्टी पिन गिळली गेल्याने ती अन्ननलिकेत अडकली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) कान, नाक व घसा विभागातील डॉक्टरांनी कौशल्यपूर्ण उपचार करून ही पिन यशस्वीरीत्या बाहेर काढली. या प्रक्रियेदरम्यान अन्ननलिकेला छिद्र पडणे, रक्तस्राव होणे किंवा श्वसनमार्गात वस्तू जाण्याचा धोका होता. त्यामुळे अत्यंत सावधगिरीने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कान, नाक व घसा विभागप्रमुख डॉ. राजश्री चौरपगार, डॉ. अक्षय सरोदे, डॉ. ललित राणे यांच्यासह निवासी डॉक्टरांच्या पथकाने ही कामगिरी केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

इंडिया आघाडीचा विधेयकाला विरोध; द्रमुक, अकाली दल, BRS, YSR काँग्रेसचा विधेयकाला पाठिंबा; तर काँग्रेस, सपा, ठाकरे सेनेचा विरोध

आजचे राशिभविष्य, २९ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Pressure Cooker Cleaning Tips : कुकरच्या शिट्टीमध्ये अडकलीये घाण? फक्त २ मिनिटांत करा स्वच्छ; जाणून घ्या सोपी पद्धत

रात्रीचा भात उरलाय? फोडणीचा भात न करता बनवा हॉटेलसारखी बिर्याणी; रेसिपी अगदी सोपी

Mumbai : लोकल प्रवाशांची गैरसोय होणार! मध्य रेल्वेसह ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही दुरुस्तीची कामे, वाचा सविस्तर