महाराष्ट्र

Jalgaon City Municipal Corporation Elections 2026 : जळगावात ७५ जागांसाठी १०३८ उमेदवारांचे अर्ज दाखल

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी ७५ जागांसाठी १०३८ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. ही संख्या मागील २०१८ मधील निवडणुकीतील ६१५ अर्जांपेक्षा प्रचंड जास्त आहे. सात वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड उत्सुकता होती, त्यामुळे शेवटच्या दिवशी मंगळवारी अखेरचे अर्ज सादर करण्यात आले.

Swapnil S

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीसाठी ७५ जागांसाठी १०३८ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. ही संख्या मागील २०१८ मधील निवडणुकीतील ६१५ अर्जांपेक्षा प्रचंड जास्त आहे. सात वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड उत्सुकता होती, त्यामुळे शेवटच्या दिवशी मंगळवारी अखेरचे अर्ज सादर करण्यात आले. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पक्षांनी उमेदवारी जाहीर न केल्याने अनेक इच्छुक उमेदवार धास्तावलेले होते. भाजपाने १४ जणांना उमेदवारी नाकारली, तर पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या अनेक उमेदवारांना देखील तिकीट मिळाले नाही.

विशेष म्हणजे गेल्या ५० वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ राहणाऱ्या उदय भालेराव यांना रात्री अर्ज भरण्यासाठी तयारी करण्यास सांगितले गेले, पण दुपारी उमेदवारी न मिळाल्याची त्यांना माहिती मिळाली. यावरून त्यांनी पक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली. काही उमेदवारांनी पक्ष बदलून अन्य पक्षाची उमेदवारी स्वीकारली.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी २५ पेक्षा कमी जागा स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, जागा वाटपात भाजपाने या पक्षाला स्थान न दिल्याने, पक्ष नेत्यांनी घरातल्या व्यक्तींसाठी तिकीट मिळवण्यासाठी सहा जागा मान्य केल्या. या घटनेचा निषेध करत अजित पवार गटाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी तात्काळ पक्षाची विक्री झाल्याचा आरोप करत पदाचा राजीनामा दिला, ज्यामुळे पक्षात खळबळ उडाली. तिकीट वाटप करताना पक्षनिष्ठेला प्राधान्य मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु वास्तविकता वेगळी होती. पक्षाने घरातील माणसांना सोयीने तिकीट देऊन घराणेशाहीला हातभार लावल्याचे दिसून आले.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

Noida Bus Fire : 'ती उतरल्यावरच मी उतरेन'; जळत्या बसमधून स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी आईसोबत थांबला, मायलेकांचा करुण अंत

Mumbai : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; ४ भाविक जखमी, संतप्त जमावाकडून गाडीची तोडफोड, VIDEO

शिवनेरीचे तिकीट आता व्हॉट्सॲपवरून बुक करता येणार; दादर-पुणे शिवनेरीसाठी एसटी महामंडळाची प्रायोगिक सुविधा