Jalgoan : तरुण शेतकऱ्याची बिबट्याशी थरारक झुंज; बिबट्याला जिवंत पकडून दिले वनविभागाच्या ताब्यात 
महाराष्ट्र

Jalgoan : तरुण शेतकऱ्याची बिबट्याशी थरारक झुंज; बिबट्याला जिवंत पकडून दिले वनविभागाच्या ताब्यात

जामनेर तालुक्यातील शहापूर येथे एका तरुण शेतकऱ्याने धाडस आणि प्रसंगावधान दाखवत बिबट्याशी झुंज देऊन त्याला जिवंत पकडल्याची थरारक घटना घडली आहे.

Swapnil S

जळगाव : जामनेर तालुक्यातील शहापूर येथे एका तरुण शेतकऱ्याने धाडस आणि प्रसंगावधान दाखवत बिबट्याशी झुंज देऊन त्याला जिवंत पकडल्याची थरारक घटना घडली आहे. मुकेश नाना डोंगरे असे या धाडसी शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेत ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जामनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या या धाडसाचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

बुधवारी दुपारी मुकेश डोंगरे हे शहापूर परिसरातील शेतात पेरणीपूर्व मशागतीची कामे करत होते. यावेळी अचानक एका बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, न डगमगता मुकेश यांनी बिबट्याशी प्रतिकार करत झुंज दिली आणि त्याला पकडून ठेवले.

या झटापटीदरम्यान बिबट्याने पंज्याने वार केल्याने मुकेश जखमी झाले. तरीही त्यांनी धैर्य न सोडता बिबट्याला आवळून धरले. ही घटना पाहून जवळील शेतांमध्ये काम करणारे इतर शेतकरी मदतीसाठी धावून आले. त्यांनीही बिबट्याला नियंत्रित ठेवण्यासाठी सहकार्य केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. जखमी मुकेश डोंगरे यांना तातडीने जामनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Mumbai Local Update : उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक

प्रत्येक बालकाला २२ नोव्हेंबरला पोलिओचे डोस; मुंबईत रविवारी पल्स पोलिओ मोहीम; २३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान लसीकरण

Instagram New Feature : स्टोरी पोस्ट करताना चूक झाली? टेन्शन नको! १५ मिनिटांत 'अशी' करा एडिट; जाणून घ्या सर्व प्रोसेस

Pune : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात महिलांचा राडा; शिवसेना ठाकरे गटाच्या रेखा कोंडे यांना मारहाण, चौघींवर गुन्हा दाखल

Mumbai : तरुणीची छेड काढली, विरोध करताच दोघांना बेदम मारहाण; कुर्ल्यातील व्हायरल VIDEO प्रकरणी ८ अल्पवयीन ताब्यात