महाराष्ट्र

"जिंकलंस भावा...", खासदार अमोल कोल्हेंची राम मंदिरावर भन्नाट कविता; सत्ताधाऱ्यांना कोपरखळ्या

Rakesh Mali

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान वाचलेली हिंदी कविता चर्चेचा विषय ठरत आहे. यात कोल्हे यांनी राम मंदिर लोकापर्ण सोहळ्याचे राजकारण केल्यावरुन भाजप सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

कोल्हे यांनी वाचलेल्या कवितेत मंदिराच्या लोकापर्णावरुन देशात सुरु असलेले राजकारण, महागाई, बेरोजगारी, केंद्रीय यंत्रणांचा हस्तक्षेप आणि इतर मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी धर्म आणि संविधानाची सांगड घालत केलेली ही कविता अल्पकाळातसोशल मीडियावर लोकप्रिय झाली असून अनेक राजकारण्यांनी ती शेअर केली आहे.

राज्याच्या माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी ही कविता त्यांच्या 'एक्स'अकाऊंटवर शेअर करत तिला "जिंकलंस भावा..." असे कॅप्शन दिले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सुष्मिता देव यांनी कोल्हे यांनी भाषणाचे कौतुक करत त्याला नम्र आणि शक्तिशाली म्हणत अत्यंत प्रभावी असल्याचे म्हटले आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील कोल्हे यांचा व्हिडिओ 'एक्स'वर शेअर करत तो ऐकण्याचे आवाहन केले आहे.

आपला मार्ग योग्य आहे..!

दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी देखील त्यांच्या 'एक्स'हँडलवर मुंबईल लोकलमधील एक फोटो पोस्ट केला आहे. यात मुंबई लोकल ट्रेनमध्ये एक व्यक्ती कोल्हे यांचे संसदेतील भाषण ऐकताना दिसत आहे. "आपला मार्ग योग्य आहे..! मी ग्रामीण भागाचा प्रतिनिधी असलो तरी मुंबईतल्या धकाधकीच्या जीवनाची मला कल्पना आहे. त्यातही लोकल ट्रेन म्हटलं की चाकावरचं जीवन... जिथे कोणाला एकमेकांकडे बघण्याची फुरसत नसते तिथे लोक आवर्जून माझं संसदेतलं भाषण ऐकताय हे बघून समाधान वाटतं", असे कोल्हे यांनी हा फोटो पोस्ट करत म्हटले आहे. तसेच, "आपण स्वीकारलेला मार्ग योग्य आहे याची खात्री होते आणि या मार्गावर चालण्यासाठी शंभर हत्तींचं बळ मिळतं!", असेही त्यांनी म्हटले आहे.

"एकनाथ शिंदेंना अपमानित करायचं नव्हतं..." देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

"उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच", चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, तब्बल १०७ कोटी रुपये किंमतीचं ड्रग्ज जप्त, राजस्थानमधील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश

ज्याला देव मानलं त्यानंच केला घात... नराधम शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला बलात्कार

लॉटरीच की! फक्त ९ हजारात मिळतोय सॅमसंगचा 'हा' 5G स्मार्टफोन; जाणून घ्या काय आहे फीचर्स?