महाराष्ट्र

Nagpur Viral Video : 'कोलकात्यात घडले तेच तुमच्यासोबत करेन'; रिक्षाचालकाची शाळकरी मुलींना धमकी, लोकांनी धु धु धुतलं

Swapnil S

'कोलकातामधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरसोबत जे घडले तेच तुमच्यासोबत करेन', अशी धमकी देणाऱ्या रिक्षाचालकाला दोन शाळकरी मुलींनी रिक्षा थांबवायला सांगून चांगलाच चोप दिल्याची घटना नागपूरमधून उघडकीस आली आहे.

रिपोर्ट्सनुसार, मागे बसून मोठ्याने बोलू नका असे रिक्षाचालकाने मुलींना सुनावल्यानंतर त्यांच्यात वादाला सुरूवात झाली. वाद लगेचच चिघळला आणि चालकाने कोलकात्याच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या अलीकडील प्रकरणाचा संदर्भ देत विद्यार्थिनींना धमकी दिली. "कोलकाता येथील मुलीसोबत जे घडले तेच मी तुमच्यासोबत करीन," असे तो म्हणाला. लागलीच मुलींनी चालकाला रिक्षा थांबवायला सांगून त्याला बाहेर खेचले आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. रस्त्यात हाणामारी होत असल्याचे पाहून काही स्थानिकही तेथे आले. चालक मुलींना जे म्हणाला ते समजल्यावर त्यांनीही त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

या घटनेचा कथित व्हिडिओही व्हायरल झाला असून त्यात, लोकं रिक्षा चालकाला मारताना दिसतायेत. 'तू सुरक्षित आहेस, आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत', असे म्हणत एक महिला घाबरलेल्या शाळकरी मुलीचे सांत्वन करताना दिसतेय. काही वेळाने जमावाने आग्रह केल्यावर मुलगीही रिक्षाचालकाला चोप देते. तर, चालक दारुच्या नशेत असल्याचंही एक व्यक्ती म्हणत असल्याचं ऐकू येत आहे.

नागपुरातील पारडी पोलीस हद्दीत मंगळवारी दुपारी घडलेली ही घटना शुक्रवारी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उघडकीस आली. वृत्तानुसार, पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून ऑटो चालकावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा