कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला 
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरण: कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात हिला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. राहता सत्र न्यायालयाने कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Swapnil S

अहिल्यानगर : नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात हिला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. राहता सत्र न्यायालयाने कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. बुधवारी पार पडलेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंनी सुमारे सव्वा तास जोरदार युक्तिवाद झाला, मात्र सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.

कल्पना खरातवर पती अशोक खरात याच्या कथित बेकायदेशीर कृत्यांमध्ये सक्रिय साथ दिल्याचा आरोप आहे. तपासात असे समोर आले आहे की, अनेक बँक व्यवहार आणि जमिनीच्या खरेदी-विक्रीत तिचा थेट सहभाग होता. शिर्डीतील एका शेतकऱ्याची जमीन खरेदी प्रकरणात मोठी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप तिच्यावर आहे. या व्यवहारांतील पैसे कल्पनाच्या भावांच्या खात्यातून वळवण्यात आल्याचेही एसआयटी तपासात उघड झाले आहे.

कल्पना खरात ३१ मार्चपासून फरार असून, तिने वकिलामार्फत न्यायालयात आपली बाजू मांडली होती. तिच्या अटपूर्व जामिन अर्जावर राहता न्यायालयात सुनावाणी पार पडली. या सुनावणीदरम्यान कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी तिचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. गिरी यांनी असा युक्तिवाद केला की, कल्पना ही केवळ गृहिणी असून अशोक खरातच्या कथित गैरकृत्यांशी तिचा कोणताही थेट संबंध नाही. तिची सर्व बँक खाती अशोक खरातच हाताळत होते आणि व्यवहारांच्या कोणत्याही बैठकीत ती उपस्थित नव्हती, असा दावा करण्यात आला. मात्र, सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी हे सर्व मुद्दे खोडून काढले. आरोपी महिला जाणीवपूर्वक तपास यंत्रणेला सहकार्य करत नसल्याचा आणि ती देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्याचा मुद्दा पोलिसांनी लावून धरला.

पोलिसांकडून यापूर्वीच लूकआऊट नोटीस' जारी

कल्पना खरात देशाबाहेर पळून जाऊ नये, यासाठी पोलिसांनी यापूर्वीच तिच्याविरोधात 'लूकआऊट नोटीस' जारी केली आहे. तिचा जामीन अर्ज फेटाळल्या गेल्यामुळे आता पोलिस तिला कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी या प्रकरणात तिचा मुलगा हर्षवर्धन आणि तिच्या दोन भावांचीही कसून चौकशी केली आहे.

Mumbai : दुसरी लाईफलाइन ठरतेय ‘काळ’...वर्षभरात ‘बेस्ट’च्या धडकेत ३२ जणांचा मृत्यू

साखरपुड्याच्या आनंदावर विरजण! जळगावात कार-एसटी-दुचाकीचा विचित्र अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा अंत, दुचाकीस्वारही ठार

मे महिन्यात ईव्ही विक्रीचा नवा विक्रम; देशात विजेवरील वाहनांच्या लोकप्रियतेत वाढ

Mumbai : पीओपी मूर्तींवर तत्काळ बंदी नको; बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी

Dadar BEST Bus Accident : घरात लग्नाची तयारी, बहिणीच्या संसाराचीही स्वप्नं; पण क्षणात सर्व संपलं, २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू