कराडमध्ये पोकलेन ब्रेकर चोरांना अटक; गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई; सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 
महाराष्ट्र

कराडमध्ये पोकलेन ब्रेकर चोरांना अटक; गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई; सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पोकलेनचा ब्रेकर चोरून कोल्हापूरला विकायला निघालेल्या परजिल्ह्यातील तीन चोरट्यांना कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख किमतीचा ब्रेकर व गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा सुमारे नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Swapnil S

कराड : पोकलेनचा ब्रेकर चोरून कोल्हापूरला विकायला निघालेल्या परजिल्ह्यातील तीन चोरट्यांना कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख किमतीचा ब्रेकर व गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा सुमारे नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जगन्नाथ किसन काळे (४७, रा. गायकवाड गल्ली, राज पिंपरी, ता.जि. बीड), जितेंद्र लक्ष्मण मुळीक (२५, रा. इदलगाव, मारूती मंदीर रोड, ता. अबंड, जि. जालना), महादेव फलाजी भिसे (३५, रा. सातारा वाहेगाव, ता. परतुर, जि. जालना) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. मागील आठ दिवसापूर्वी नारायणवाडी ता. कराड गावचे हद्दीत कोल्हापूर ते सातारा जाणारे रोडचे कडेला असणाऱ्या पोकलेनचा ब्रेकर चोरट्यांनी चोरला होता. याबाबत कराड तालुका पोलिसात तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी चोरट्यांना शोधून काढून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचून कारवाई केली.

टेम्पो अडवून केली पाहणी

मिळालेल्या माहितीप्रमाणे एका टाटा कंपनीचा छोटा हत्ती हायवेकडे जाणाऱ्या रोडवर दिसला. टेम्पो अडवून टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोमध्ये चोरीचा ब्रेकर दिसून आला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी ब्रेकर चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेला पाच लाख रूपये किमतीचा पोकलेनचा ब्रेकर व गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा सुमारे नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन येळवे करत आहेत.

उन्हाळी सुट्टीसाठी एसटी सज्ज; ठाणे विभागात ४९९ बसफेऱ्यांचे नियोजन

रिक्षाचालकांना मराठी बोलता आलीच पाहिजे! मराठी सक्तीवर परिवहन मंत्री ठाम; १ मेपासून मोहीम होणार सुरू

जात प्रमाणपत्रावरून सुरू असलेला वाद हे विरोधकांचे षडयंत्र; MIM नगरसेविकेच्या वडिलांचा आरोप

भांडुप बेस्ट बस अपघात प्रकरणी चालकावर कारवाई; विक्रोळी आगारातील तपासणीत हँडब्रेकमध्ये दोष नसल्याचा निष्कर्ष

९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली