जंगलतोडीविरोधात कर्जतमध्ये कडकडीत बंद; सह्याद्री बचाव आंदोलनाची सयाजी शिंदेंची घोषणा  
महाराष्ट्र

जंगलतोडीविरोधात कर्जतमध्ये कडकडीत बंद; सह्याद्री बचाव आंदोलनाची सयाजी शिंदेंची घोषणा

कर्जत तालुक्यातील टोरंट वीज प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोमवारी पुकारलेल्या ‘कर्जत बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर दुसरीकडे...

Swapnil S

कर्जत/नागपूर : कर्जत तालुक्यातील टोरंट वीज प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोमवारी पुकारलेल्या ‘कर्जत बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर दुसरीकडे, ‘जंगले कापून होणारा विकास खोटा आहे, आता तरी जागे व्हा आणि झाडखाऊ व्हायरसला पळवून लावा’, असे आवाहन करीत सह्याद्री फाऊंडेशनचे प्रमुख आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी सोमवारी नागपुरात ‘सह्याद्री बचाव’ आंदोलनाची घोषणा केली.

नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभिनेते शिंदे म्हणाले, की विकासाच्या नावाखाली जंगले आणि निसर्गसंपत्ती नष्ट केली जात आहे. झाडाझुडपांसकट सगळी जंगले विकायला काढली आहेत. सह्याद्री पर्वतरांगांचे अस्तित्व धोक्यात आले असून आता ते वाचवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच ‘सह्याद्री बचाव' आंदोलन सुरू करण्यात येत आहे.

दुकाने, कार्यालये बंद

कर्जतमधील व्यापारी, व्यावसायिकांसह अनेक आस्थापनांनी बंद पाळला. शहरातील सर्व व्यवसाय, संस्थांची कार्यालये बंद होती. पक्ष कार्यालय शिवालयपासून काढण्यात आलेल्या मोर्चात पक्ष कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवसेना ठाकरे पक्ष, कर्जत पर्यावरण बचाव समिती, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच अनेक समाजसेवी संस्थानी टोरंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.

‘महाराजांचे गड-किल्ले नष्ट करण्याचा डाव !’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला बळ देणारा सह्याद्रीचा नैसर्गिक वारसा, जंगले, नद्या तसेच महाराजांचे गड-किल्ले नष्ट करण्याचा कुटील डाव आहे, असा घणाघाती आरोप शिंदे यांनी केला. महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या प्रत्येकाने सह्याद्रीच्या संरक्षणासाठी एकजुटीने उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

...तर विमान प्रवास करू नका; ७०० टक्के दरवाढ याचिकेवर सुप्रीम कोर्टाची धक्कादायक सूचना

तिकीट दरांमध्ये हस्तक्षेप करण्याचे सरकारला अधिकार; प्रवासी भाड्याबाबत नवे नियम जाहीर

न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी; ठाणे, सांगली, परभणी, हिंगोली, बीड, सोलापूर न्यायालयात आले ई-मेल

राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर? नाराज नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; पवार माय-लेक वगळून NCP च्या विलीनीकरणाची चाचपणी

‘दिया’च्या आवाहनावरून गदारोळ; फटाके न फोडण्याच्या मिर्झाच्या वक्तव्याने राजकीय वातावरण पेटले, भाजपच्या आक्षेपानंतर व्हिडीओ गायब