धनंजय मुंडे, करुणा शर्मा (डावीकडून) 
महाराष्ट्र

धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षा क्रूर; करुणा शर्मा यांचा आरोप

“मी ४५ दिवस तुरुंगात होते. इतका नीचपणा कुणीही संपूर्ण भारतात कधी केला नसेल. औरंगजेबही धनंजय मुंडे आणि त्यांच्या गँगपुढे फिका पडेल, इतक्या नीच वृत्तीचे हे लोक आहेत.

Swapnil S

बीड : “मी ४५ दिवस तुरुंगात होते. इतका नीचपणा कुणीही संपूर्ण भारतात कधी केला नसेल. औरंगजेबही धनंजय मुंडे आणि त्यांच्या गँगपुढे फिका पडेल, इतक्या नीच वृत्तीचे हे लोक आहेत. औरंगजेबाने त्याच्या पत्नीला तुरुंगात टाकले नसेल. अत्यंत नीच प्रवृत्तीचे लोक आणि माझ्यासह जे २७ वर्षे त्यांनी घालवली तीदेखील क्रूर म्हणावी अशीच होती. दोन मुलांकडे बघून मी सहन करत होते. येत्या काळात मी सगळ्या गोष्टी बाहेर काढणार आहे. यामध्ये फक्त धनंजय मुंडे नाहीत, तर इतरही लोक आहेत. त्यामुळे सर्वांना शिक्षा होणार आहे,” असे आमदार धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांनी सांगितले.

धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या खटल्यात मुंबईतील माझगाव न्यायालयाने करुणा मुंडे यांना दोन लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, “न्यायालयाने जो निकाल दिला त्याबद्दल मी न्यायाधीशांचे आभार मानते. धनंजय मला भेटला तेव्हा आम्ही विद्यार्थी होतो. त्याने संघर्ष केला, तेव्हा मी माझी मालमत्ता विकली. दोनदा मंगळसूत्रही गहाण ठेवले होते. मी ते पैसे त्यांना दिले होते. मंत्री झाल्यानंतर ऐश करण्यासाठी तुम्ही अनेक महिलांशी संबंध ठेवले. मी सगळे पुरावे उघड केलेले नाहीत. माझ्या बहिणीचे व्हिडीओ, आईची आत्महत्या, मी विष प्यायले होते. या सगळ्या गोष्टी समोर आणणार आहे.”

“मी मंत्री आहे, काहीही होऊ शकते, असे त्यांना वाटत होते. माझी लढाऊ प्रवृत्ती आहे, हे माझ्या नवऱ्याला माहिती होते. मात्र त्यांच्या गँगला वाटत होते की, मी २५ ते ५० कोटी रुपये घेऊन शांत राहीन. मात्र मी नाचणारी-गाणारी महिला नाही. मी ठेवलेली बाई नाही. मला दोन मुले आहेत. त्या दोन मुलांवर मी मनापासून प्रेम केलेले आहे. त्यामुळेच मी गप्प बसले,” असेही करुणा मुंडे यांनी सांगितले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक