Kolhapur : रंकाळ्यात पर्यटकांसाठी पर्यायी पार्किंग सुविधा; वाहतूककोंडीवर प्रशासनाचा उपाय (Photo-@kolhapurtourism)
महाराष्ट्र

Kolhapur : रंकाळ्यात पर्यटकांसाठी पर्यायी पार्किंग सुविधा; वाहतूककोंडीवर प्रशासनाचा उपाय

रंकाळा तलाव परिसरातील वाढत्या वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा कडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

Swapnil S

कोल्हापूर : रंकाळा तलाव परिसरातील वाढत्या वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा कडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. रंकाळा टॉवर परिसरातील रस्त्यावर होणारी अनधिकृत पार्किंग थांबवून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

रंकाळा टॉवर परिसर ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आला असून, पर्यटकांच्या वाहनांसाठी पर्यायी पार्किंगची सुविधा दिली आहे. शालिनी पॅलेस समोरील खासगी जागेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून, संबंधित जागा मालकांशी समन्वय साधून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. पर्यटकांना पार्किंगची माहिती सहज मिळावी यासाठी रंकाळा परिसरातील विविध ठिकाणी मार्गदर्शक फलक आणि क्यूआर कोड सुविधा उभारण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांना उपलब्ध पार्किंगची माहिती त्वरित मिळणार आहे.

वाहतूक निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितले की, “रंकाळा परिसर हा कोल्हापूरच्या पर्यटनाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. पर्यटकांना कोणतीही अडचण होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पर्यायी पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी आणि पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला वाहने पार्क न करता प्रशासनाला सहकार्य करावे.”

वाहतूक शाखेकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. रंकाळा परिसरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी उचललेले हे पाऊल पर्यटक आणि नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

"६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, अनावश्यक प्रवास टाळा"; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Telegram ला केंद्र सरकारची नोटीस; बेकायदेशीर चित्रपट आणि ओटीटी कंटेंटवर कारवाईचे निर्देश

Mumbai Rain : पावसाचा जोर कायम; मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय, वसई-विरारलाही फटका, Video

जोगेश्वरीत भरधाव टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; पळ काढणाऱ्या चालकाला नागरिकांनी केलं पोलिसांच्या हवाली, Video